09:00pm | Jan 31, 2023 |
सातारा : एसटी महामंडळाचे 35 टक्के खाजगीकरण करून ग्रामीण भागामध्ये मेक्सिकॅब चालवण्याचा निर्णय राज्य शासन घेत आहे. या निर्णयाला महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचा कडाडून विरोध आहे. राज्यातील 89 हजार एसटी कर्मचाऱ्यांना 2016 पासून सातव्या वेतन आयोगाचा पगार दिला जावा, अशी मागणी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे व जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी पत्रकार परिषदेत केली.
साताऱ्यामध्ये कामगार संघटनेच्या वतीने येथील प्रमिला मंगल कार्यालयात संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या आयोजनापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत शिंदे आणि ताटे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
त्यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, राज्य शासन ग्रामीण भागामध्ये लालपरीला डावलून मॅक्सी कॅब ला परवानगी देत आहे. तसेच एसटी महामंडळाचे 35 टक्के खाजगीकरण करणारे विधेयक येऊ घातले असून तशी तयारी केली जात आहे. आज महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्यांचा लालपरीवरच विश्वास आहे. सुरक्षित प्रवासाची हमी एसटी महामंडळ देते. त्यामुळे या खाजगी गाड्यांचा काही एक उपयोग होणार नाही. 2016 ते 20 या दरम्यान तत्कालीन शासनाने 4849 कोटीचे पॅकेज एसटी महामंडळासाठी जाहीर केले होते. मात्र प्रत्यक्षात घरभाडे, महागाई भत्ता आणि मूळ पगारातल्या वाढीसंदर्भात घरभाडे भत्त्याचा दर 8 16 24 आणि वार्षिक वेतन वाढीचा दर तीन टक्के होता. वेतन वाढीचा दर तीन टक्के वरून दोन टक्के असा एकतर्फी कमी करण्यात आला. कामगारांना उरलेल्या रकमेचे वाटपही करण्यात आले नाही. त्यामुळे कामगारांची फसवणूक झाल्याची भावना प्रबळ झाली आहे.
2016 ते 20 या दरम्यान कामगार करारासाठी एकतर्फी जाहीर केलेल्या 4849 कोटी व नोव्हेंबर 21 मध्ये राज्य परिवहन कामगारांच्या मूळ वेतनात पाच हजार आणि अडीच हजार अशी वाढ करण्याचे सूचित होते. या रकमा त्यांच्या मूळ वेतनात वाढवून देणे गरजेचे असतानाही प्रत्यक्षात ती रचना अस्तित्वात न आल्याने त्यांच्या मूळ वेतन पत्रकामध्ये त्रुटी निर्माण झाल्या आहेत. राज्यातील 89 हजार कामगारांना एक एप्रिल 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू करावा या आयोगाच्या अंमलबजावणीसाठी दहा वर्षाची मुदत मान्य करण्यासाठी महामंडळ तयार आहे.
तसेच पोलीस वसाहतीच्या महाराष्ट्रामध्ये 40000 जागा आहेत. त्या पोलीस बांधवांना देण्यासाठी सुद्धा कामगार संघटनेचा कडाडून विरोध आहे. याशिवाय महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये एसटीला समांतर मेक्सि कॅब ची सेवा सुरू करण्याचे घाट घातला जात आहे. याही प्रस्तावाला कामगार संघटनेचा कडाडून विरोध आहे. राज्य सरकारने एसटी कामगारांच्या पगारासाठी दरवर्षी 360 कोटी रुपये देण्याचे कबूल केले होते. मात्र प्रत्यक्षात दरवर्षी शंभर कोटी रुपये दिले जात आहेत आणि कामगारांचे पगारही वेळेवर होत नाहीत. या सर्व मागण्यांसाठी कामगार संघटनेच्या वतीने दबावगट तयार करून त्या मागण्या अंमलबजावणीत आणण्याकरता सनदशीर मार्गाने आंदोलन करणार असल्याचे संदीप शिंदे यांनी सांगितले.
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |