पुसेगाव: जांब (ता.खटाव) येथील विश्वासराव शिंदे व कैलास शिंदे यांच्या गोठ्यात शेजारी, शेजारी असलेल्या गंजीला अचानक लागलेल्या आगीत दोन हजार कडबा व शेतीपूरक साहित्य जळून खाक झाला. सुदैवाने या आगीत जीवीत हानी झाली नाही. ही घटना सोमवारी दुपारच्या प्रहरात घडली.
याबाबतची मिळालेली माहिती अशी की, येथील विठोबाचा माळ या ठिकाणी विश्वास शिंदे व कैलास शिंदे या भावांनी शेजारी, शेजारी नुकत्याच गंजी लावून ठेवल्या होत्या. ज्वारीची सुगी संपल्यानंतर येथील शेतकरी पावसाळ्यात जनावरांना ज्वारीच्या कडबा व गवताच्या गंजी लावून ठेवतात. सोमवारी दुपारच्या प्रहरात श्री. शिंदे कुटुंबातील महिलांना गंजीतून धुर निघालेला दिसला. त्यांनी लगेच आरडाओरडा करून आजूबाजूला असलेल्या शेतकर्यांना मदतीला बोलावून घेतले. आसपास असलेल्या शेतकर्यांनीही हाक कानावर पडताच त्वरेने घटनास्थळी धाव घेऊन आजूबाजूला असलेल्या गोठ्यातून हाताला लागेल ते भांडे घेऊन पाणी आणण्यासाठी नजीकच्या हापशीकडे धाव घेतली. तथापि, तोपर्यंत आगीने रौद्र रुप धारण केले होते. एव्हाना दोन्हीही गंजीने चांगलाच पेट घेतला होता. सुदैवाची गोष्ट ही की, तोपर्यंत चांगलाच जमाव गोळा झाला. त्यांच्या मदतीने शेजारच्या वस्तीत असलेल्या बोअरला पाईप जोडून गंजीवर पाण्याचा फवारा सुरू केला त्यामुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले. अन्यथा आजूबाजूच्या वस्तीत आग पसरून मोठा अनर्थ घडला आसता.
आगीचे कारण समजू शकले नाही. मात्र आगीत वैरणीचे मोठे नुकसान झाले असून सध्या जनावरांना उन्हाळ्याच्या दिवसात खायला एकही पेंडी शिल्लक नसल्यामुळे जनावरांना खायला काय घालायचे? हा प्रश्न श्री.शिंदे कुटुंबियांना पडला आहे. झालेल्या नुकसानीचा रीतसर पंचनामा करून शासनाने मदत करावी, अशी मागणी शिंदे कुटुंबियांनी केली आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |