04:43pm | Apr 15, 2021 |
मुंबई: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याची विजडन अलमॅनाकने 2010 ते 2020 या दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू म्हणून त्याची निवड केली आहे. त्यामुळे अनेक विक्रमांना गवसणी घालणार्या भारतीय कर्णधाराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
यापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर 90 च्या दशकातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू, तर कपिल देवचा 80 दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून गौरव करण्यात आला आहे. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांना 50 वर्षे पूर्ण झाल्याने दशकातील पाच एकदिवसीय क्रिकेटपटूंची निवड करण्यात आली आहे. 1971 ते 2021 या कालावधीतील पाच क्रिकेटपटूंना हा मान देण्यात आला आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि कपिल देव यांनाही मान मिळाला आहे. 90च्या दशकात केलेल्या कामगिरीसाठी सचिनची निवड करण्यात आली आहे. सचिनने 1998मध्ये 9 शतकं झळकावली होती. तर कपिल देवला 80 च्या दशकातील कामगिरीसाठी मान देण्यात आला आहे. कपिल देवच्या नेतृत्वाखालील संघाने 1983 साली भारताला विश्वचषक जिंकून दिला होता. या दशकात कपिलने सर्वाधिक गडी बाद केले होते. सर्वाधिक स्ट्राइक रेटने 1 हजाराहून अधिक धावा केल्या होत्या.
इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सची सलग दूसर्या वर्षी सर्वोत्कृष्ट क्रिकेटर म्हणून निवड केली आहे. ऑस्ट्रेलियाची बेथ मुनी हिला सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटर म्हणून गौरविण्यात आलं आहे. तर वेस्टइंडीजच्या कीरॉन पोलार्डला सर्वोत्कृष्ट टी 20 क्रिकेटपटू म्हणून निवडलं आहे.
दरम्यान, भारतीय कर्णधार विराट कोहलीने 2008 साली श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. विराटने 254 एकदिवसीय सामन्यात 12 हजार 169 धावा केल्या आहेत. विश्वचषक 2011च्या विजेता संघाचा सदस्य असलेल्या विराटने दहा वर्षात 11 हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. त्यात 42 शतकांचा समावेश आहे.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |