08:23pm | Nov 26, 2022 |
सातारा : जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी गुन्हेगारांच्या मागे तडीपारचे शस्त्र परजत कराड शहरातील गंभीर गुन्ह्यांमधील तीन जण दोन वर्षासाठी तडीपार केले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराड शहर पोलीस ठाणे हद्दीत जिवे मारण्याचा प्रयत्न, गंभीर दुखापत, खुनासाठी अपहरण आदी गंभीर गुन्ह्यांमधील टोळीचा प्रमुख अविनाश अशोक येडगे वय 24, पृथ्वीराज बळवंत येडगे वय 24, देवेंद्र अशोक येडगे वय 22 सर्व राहणार जखीनवाडी तालुका कराड यांना जिल्ह्यातून तडीपार करण्याबाबत कराड शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी हद्दपार प्रस्ताव सादर केला होता. त्याची सखोल चौकशी करून कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बी. रणजीत पाटील यांनी आपला अहवाल सादर केला होता. या अहवालाची दखल घेत हद्दपार प्राधिकरण तथा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी वरील तिघांना दोन वर्षासाठी पूर्ण सातारा जिल्हा व सांगली जिल्ह्यातील वाळवा, कडेगाव, शिराळा तालुका हद्दीतून हद्दपारचा आदेश केला आहे.
प्रतिबंधात्मक कारवाई करूनही या टोळीतील संशयितांच्या हालचालींमध्ये प्रतिबंध झाला नव्हता. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे फार मोठे आर्थिक व शारीरिक नुकसान झाले आहे. वरील तिघांना कायद्याचा धाक नसून ते बेकायदेशीर कारवाया करीतच आहेत. त्यांना सुधारण्याची संधी देऊनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती. तसेच त्यांचा सर्वसामान्य जनतेस उपद्रव होत होता. त्यामुळे जनतेमधून या तिघांवर कडक कारवाई करण्याकरता मागणी होत होती.
या कारवाईत हद्दपार प्राधिकरणा पुढे सरकार पक्षाच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस उपनिरीक्षक मधुकर गुरव, पोलीस नाईक प्रमोद सावंत, पोलीस कॉन्स्टेबल केतन शिंदे, महिला पोलीस कॉन्स्टेबल अनुराधा सणस यांनी योग्य पुरावा सादर केला या कारवाईबाबत सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
युवकाचे अपहरण करून त्याचा खून केलेले संशयित 36 तासात रत्नागिरी येथून जेरबंद |
गर तू मेरा नही हो सका, तो किसी और का होने नहीं दूंगी... |
वाढे फाटा येथील मारेकरी ताब्यात; सूत्रधार कोण? |
दोन लाखांचे दागिने घेऊन कारागीर पळाला |
एकाची 35 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
टेस्टिंग सर्टिफिकेटच्या आमिषाने सुमारे 97 हजारांना गंडा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
बैलगाडीतून पडून महिलेचा मृत्यू |
दहावीतील मुलांनी धाक दाखवण्यासाठी चक्क क्लासमध्ये नेला कोयता |
राज्यात आदर्शवत ठरतील असे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आदर्श शाळा तयार करा : पालकमंत्री शंभूराज देसाई |
हॉटेलमध्ये विसरलेले १४ तोळे दागिने मिळाले परत |
रेशनिंग दुकानदार केरोसिन परवानाधारक संघटनेचे जिल्हा प्रशासनाला निवेदन |
कराडचा उड्डाणपूल पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून हिरवा कंदील... |

खानापूरच्या युवकाचा परखंदीत निर्घृण खून; वाई तालुक्यात खळबळ |
तांब्याच्या तारेची चोरी |
नोकरीच्या आमिषाने तब्बल चार लाख 99 हजाराची फसवणूक |
युवतीच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा दाखल |
मध्यमवर्गीय, शेतकरी, गोरगरीबांना न्याय देणारा अर्थसंकल्प |