सातारा : अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक व्हावी यासाठी महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघाने आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे अनेक प्रश्न शासनाकडे प्रलंबित आहेत. अंगणवाडी सेविका- मदतनीस या एकात्मिक बाल विकास प्रकल्पामध्ये काम करतात. हा प्रकल्प महाराष्ट्र शासनामार्फत चालवला जातो परंतु या अंगणवाडी सेविका, मदतनीस सरकारी काम करत असूनही त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा दिलेला नाही. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नवीन शिक्षा नितीनुसार सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांना शासकीय कर्मचारी म्हणून घोषित करावे. सध्या माध्यमिक शिक्षकांना जो पगार दिला जातो आणि ज्या सवलती दिल्या जातात त्या सर्व सवलती त्यांना मिळाल्या पाहिजेत. सद्य परिस्थितीत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची अनेक पदे रिक्त आहेत, ती पदे त्वरित भरण्यात यावीत. अंगणवाडी सेविकांना निवृत्त झाल्यानंतर अंगणवाडी कल्याण निधीमधून एक लाख रुपये दिले जातात. ही रक्कम अतिशय अपुरी असून त्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ग्रॅज्युटी मिळावी. अंगणवाडी सेविका यांना सुपरवायझर या पदावर भरती देण्याची व्यवस्था आहे. त्यांना सेवा जेष्ठतेनुसार बढती देण्यात यावी. अंगणवाडी सेविकांना दिले जाणारे मानधन वेळेवर मिळत नाही, ते दर महिन्याच्या पाच तारखेपर्यंत देण्यात यावे. सेविका व मदतनीस यांना दिवाळीत म्हणून दहा हजार रुपये देण्यात यावेत. त्यांना कार्यालयीन कामासाठी प्रवास करावा लागतो परंतु प्रवास भत्ता किंवा मिटिंग भत्ता मिळत नाही. सेविका व मदतनीस यांना त्यांच्या निगडित कामाव्यतिरिक्त अनेक प्रकारची शासकीय कामे करावी लागतात मात्र त्या कामाचा मोबदला त्यांना दिला जात नाही. सेविका व मदतनीस यांना शिक्षकांप्रमाणे उन्हाळी सुट्टी मिळावी, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. २०१४ पासून नाममात्र वर्गणी घेऊन कामगारांचे सभासदत्व नियमित करावे. घरेलू कामगारांना मंडळांनी यापूर्वी जाहीर केलेले लाभ सध्याच्या परिस्थितीनुसार बदल करून पूर्वलक्षी प्रभावाने देण्यात यावे, त्यांना सामाजिक सुरक्षा कोड त्वरित लागू करावा, पेन्शन योजना लागू करावी या मागण्यांचाही निवेदनात समावेश करण्यात आला आहे.
भारतीय मजदूर संघाच्या झेंड्याखाली आंदोलने
साताऱ्यात आज झालेली विविध आंदोलने भारतीय मजदूर संघाच्या झेंड्याखाली झाली. जिल्ह्यातील संघटित व असंघटित क्षेत्रामध्ये सुमारे एक हजार कामगार विविध क्षेत्रांमध्ये काम करतात. त्यामध्ये औद्योगिक, बांधकाम, घरेलू, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस, रिक्षा चालक-मालक, विमा एजंट, बँक, एलआयसी कर्मचारी यांचा समावेश असल्याने अंगणवाडी कर्मचारी संघाची, बांधकाम कामगार महासंघाची जिल्हा रिक्षा वाहक संघाची आंदोलने भारतीय मजदूर संघाच्या झेंड्याखाली करण्यात आली.
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |