05:43pm | Nov 18, 2020 |
फलटण : शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार व काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी दूरदृष्टीने सर्व अनुकुल प्रतिकुल बाजुंचा अभ्यास करून भाजपला बाजुला ठेवून एकत्र येत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले व ते दमदारपणे चालवले आहे.
महाराष्ट्र जनतेच्या हिताचे व महाविकास आघाडीसाठी पोषक असलेले निर्णय सकारात्मकपणे तीनही पक्ष एकत्रित घेत आहेत. महाराष्ट्र राज्यातील पदवीधर निवडणुकीतही शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस या तीनही पक्षांनी एकमत करत एकत्रित महाविकास आघाडीतच निवडणुका लढवण्याचा योग्य व सकारात्मक निर्णय घेतला आहे.
पुणे पदवीधर निवडणुकीसाठी उभे असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार अरुण गणपती लाड यांच्या प्रचारार्थ फलटण शहरात पदवीधर संवाद मेळावा आज दिनांक 18 रोजी आयोजित करण्यात आला होता. परंतु फलटण तालुक्यातील जनतेच्या प्रत्येक समस्येवर संघर्ष करुन जनतेच्या समस्या सोडवण्यात अग्रभागी असलेल्या फलटण तालुक्यातील शिवसेना पक्षाशी मेळाव्यास उपस्थित राहणेसंबंधी कोणताही संवाद साधण्यात आला नाही. महाविकास आघाडी आपल्याच आघाडीतील महत्वाच्या घटक पक्षाशी संवाद साधु शकत नाही, तर मग मतदारांशी कसा संवाद साधणार ? अशा कडवट प्रतिक्रिया फलटण तालुक्यातील शिवसैनिकांकडुन येत असल्याचे शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे, दुसरे तालुका प्रमुख स्वप्निल मुळीक, शहरप्रमुख रणजित कदम यांनी सांगितले.
यावर शिवसेनेचे एक शिष्टमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटुन महाविकास आघाडीचा उमेदवार निवडुन आणायचा आहे की पाडायचा आहे ? यासंबंधी भेटुन विचारणा करणार असल्याचे शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे, दुसरे तालुका प्रमुख स्वप्निल मुळीक व शहरप्रमुख रणजित कदम यांनी सांगितले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |