सातारा : मोरेवाडी, ता. सातारा येथे एकाचा विळयाने खून केल्याने तेथीलच रमेश ऊर्फ बाळू बाजीराव मोरे यांना न्यायालयाने ४ वर्षाची सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंड दंड न भरल्यास दोन महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली.
दि. १३ ऑगस्ट २०१६ रोजी दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास मोरेवाडी, ता. सातारा येथे राहत्या घराच्या शेजारी असणाऱ्या जमिनीमध्ये ज्ञानदेव गोपाळ मोरे हे म्हैस चारत असताना त्या ठिकाणी रमेश ऊर्फ बाळू बाजीराव मोरे तेथे आले. म्हैस चारण्याच्या कारणावरून ज्ञानदेव मोरे आणि रमेश ऊर्फ बाळू मोरे यांच्यात वाद झाले. यावेळी रमेश उर्फ बाळू मोरे यांनी ज्ञानदेव मोरे यांच्यावर विळयाने हल्ला केला. त्यामध्ये ज्ञानदेव मोरे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ सातारा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दि. १४ऑगस्ट २०१६ रोजी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला याबाबत युवराज ज्ञानदेव मोरे रा. मोरेवाडी, ता. सातारा यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एल. जाधव यांनी तपास करून दि. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
आज पहिले अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. एल. मोरे यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. त्यांनी रमेश ऊर्फ बाळू बाजीराव मोरे यांना ४ वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. एन. डी. मुके यांनी सरकारी वकील म्हणून कामकाज पाहिले. पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र यादव, शिवाजी घोरपडे, पोलीस हवालदार शमशुद्दीन शेख, अजित शिंदे, कांचन बेंद्रे, उर्मिला घाडगे, अजित शिंदे यांनी त्यांना मदत केली.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |