सांगली : टी-20 विश्वचषकातील सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात भारताचा पराभव झाला. पाकिस्तान संघाने दहा विकेट्सनी दमदार विजय मिळवला. त्यामुळे भारतीय संघाची विश्वचषकातील सुरुवातच खराब झाली आहे. भारताचा पराभव झाल्याने अनेक क्रिकेटप्रेमींनी नाराजगी व्यक्त केली असून सांगली येथे काही क्रिकेटप्रेमींनी थेट टीव्ही फोडला.
ही घटना सांगलीच्या इस्लामपूर मधील पाटील गल्लीतील आहे. तर या प्रकाराची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. भारतीय संघाचा पराभव झाल्याने संतप्त सांगली क्रिकेटप्रेमींनी रस्त्यावरच टीव्ही फोडला. या घटनेची सीसीटीव्ही फुटेज समोर आली आहे. तसेच ही फुटेज जोरदार व्हायरल होत आहे.
सामन्याच्या सुरुवातीलाच सुमार फलंदाजीमुळे भारतीय संघाची हार झाली. फलंदाजीमुळे केवळ 151 धावा भारताने केल्यानंतर पाकिस्तान संघाने फलंदाजी करत 10 विकेट्सने सामना जिंकला. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या दोन्ही सलामीवीरांनी अर्धशतके ठोकली. फलंदाजीची सर्वाधिक मतदार असलेल्या सलामीवीर रोहित आणि राहुल यांनी 10 आणि 3 रन्स केले. संपूर्ण सामन्यात विराट आणि ऋषभने झुंज दिली. यात विराटने 57 आणि पंतने 39 धावा केल्या. त्यानंतर कोणालाच खास कामगिरी करता न आल्याने संपूर्ण संघाचा डाव 151 धावांवर आटोपला.
दरम्यान, सर्वांचे लक्ष वेधून घेतलेल्या भारत-पाकिस्तान सामन्यानंतर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही प्रेक्षकांनी भारताचा पराभव झाला असला तरीही भारतीय क्रिकेट खेळाडूंची स्तुती केली आहे. तर काहींनी त्यांच्यावर संताप तसेच नाराजगी व्यक्त केली आहे. अशातच सांगली येथील संतप्त क्रिकेटप्रेमींनी थेट टीव्ही फोडल्याच्या चर्चा होत आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |