10:54am | Oct 17, 2021 |
पुसेगाव : कांदा हे पिक वातावरणाशी संवेदनशील व बाजारपेठेतील दराच्या चढउतारामुळे शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगून अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी एकात्मिक पिक व्यवस्थापन तंत्राज्ञानाचा अवलंब करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन निलेश थोरात, शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र, कालवडे यांनी राजापूर येथील सावतामाळी मंदिरामध्ये कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विध्यमाने आयोजित केलेल्या शेतकरी प्रशिक्षणामध्ये मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आत्मा अंतर्गत कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे व उत्पादन खर्च कमी करण्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन केले जातात, यावेळी कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी सचिन लोंढे, कृषी पर्यवेक्षक नामदेव कोळेकर, मुकुंद म्हेत्रे, रामा अग्रोटेक बारामतीचे नितीन भुजबळ, सुमोठुमो कंपनीचे निलेश एडके, आत्माचे बीटीएम राहुल कर्चे उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना निलेश थोरात म्हणाले की, कांदा पिकामध्ये पुर्वमशागतीपासून रोपे तयार करणे, लागवड करणे, खत व्यवस्थापण व पिक संरक्षण यांची काटेकोरपणे अंमलबजावणी मुळे अपेक्षित उत्पादन सहजपणे घेता येईल.
यावेळी बोलताना नितीन भुजबळ म्हणाले की, सेंद्रिय पद्धतीने कांदा पिकामध्ये सेंद्रिय निविष्ठाचा वापर केल्यास जमिनीचे आरोग्य उत्तम राहून कांदा पिकाचे शाश्वत व दर्जेदार उत्पादन मिळू शकते. यासाठी सेंद्रिय पद्धतीने कांदा लागवड करणे आवश्यक असल्याचे म्हणाले, तसेच निलेश एडके यांची कांदा पिकावरील किडरोग व खत व्यवस्थापन बद्दल तांत्रिक मार्गदर्शन केले.
मुकुंद म्हेत्रे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व कृषी योजने बद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले, तर आत्माचे राहुल कर्चे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाचे उषाताई चवरे, संतोष शिंदे, गणेश खिलारे, संतोष नेवसे, सागर लाळगे व राजापूर येथील राजेंद्र घाडगे पाटील, दशरथ घनवट यांनी परिश्रम घेतले.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |