10:59pm | Jul 07, 2020 |
सातारा : सातारा जिल्ह्यातील पवनचक्यांसह ठिकठिकाणी तांब्याच्या तारा चोरी करणार्या चौघांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने (एलसीबी) अटक केली. संशयितांकडून पोलिसांनी 1 लाख 51 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, संशयित सर्वजण सातारा तालुक्यातील आहेत.
अरविंद शंकर शिंदे (वय35), सुखदेव बाळू शिर्के (वय 39), लक्ष्मण पांडूरंग शिर्के (वय 36), रामचंद्र लक्ष्मण शिर्के (वय 30, सर्व रा.चिखली ता.सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, चाळकेवाडी, ठोसेघर परिसरात पवनचक्क्यांमधील तांब्याच्या तारा चोरीचे प्रमाण वाढले होते. याशिवाय जिल्ह्यात इतर ठिकाणीही असेच प्रकार झाले होते. त्यानुसार एलसीबीचे पोलिस संशयितांच्या शोधात होते. तांब्याच्या तारा विक्री करण्यासाठी बुधवार नाका येथे काहीजण येणार असल्याची माहिती एलसीबीला मिळाली. पोलिसांनी त्यानुसार पोलिसांनी सापळा लावला. दुचाकीवर काही जणांच्या संशयास्पद हालचाली आढळल्यानंतर पोलिसांनी संशयितांची धरपकड केली. यामुळे बुधवार नाक्यावर गोंधळ उडाला. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकड तांब्याच्या ताराबाबत विचारणा केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली.
पोलिसांनी संशयितांना एलसीबी विभागात आणल्यानंतर त्यांनी चिखली, डफळवाडी ता.पाटण येथे गेल्या आठ दिवसांमध्ये चोर्या केल्याची कबुली दिली. एलसीबी पथकाने संशयितांचा ताबा सातारा तालुका पोलिसांच्या ताब्यात दिला. दरम्यान, संशयितांनी आणखी काही ठिकाणी चोर्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.
पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक धिरज पाटील, पोनि सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार प्रसन्न जर्हाड, उत्तम दबडे, तानाजी माने, राम गुरव, संतोष पवार, विजय कांबळे, रवि वाघमारे, अर्जुन शिरतोडे, अजित कर्णे, संजय जाधव यांनी कारवाईत सहभाग घेतला.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |