सातारा : सातारा जिल्हा पोलिस दलाअंतर्गंत कराड तालुका पोलिस ठाण्यात कर्तव्य बजावणारे पोलिस हवालदार संताजी दादू जाधव यांना पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी निलंबित (सस्पेंड) केले. कराड पोलिस वसाहतीमध्ये महिलेला चिठ्ठी लिहून त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहेे. दरम्यान, एसपींच्या या कारवाईने पोलिस दलात खळबळ उडाली आहेे.
याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना एक महिन्यापूर्वी समोर आली आहे. संताजी जाधव हे कराड पोलिस वसाहतीमध्ये राहत होते. या दरम्यान वसाहतीमध्ये राहणार्या पोलिस कुटुंबियाच्या एका महिलेला त्यांनी चिठ्ठी लिहली. ही घटना समोर आल्यानंतर संबंधित पोलिस असणार्या कुटुंबियांनी कराडमधील वरिष्ठ पोलिसांकडे धाव घेवून तक्रार केली. कराड पोलिसांनी या घटनेची माहिती पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना दिल्यानंतर त्यांनी चौकशी लावली.
या घटनेची माहिती समोर आल्यानंतर कराडसह संपूर्ण पोलिस दलात खळबळ उडाली. चिठ्ठी प्रकरण समोर आल्यानंतर पोलिस हवालदार संताजी जाधव यांच्याविरुध्द कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच एसपींनी चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर त्यानुसार तो अहवाल पोलिस अधीक्षक कार्यालयात पाठवण्यात आला. अहवालानंतर एसपी तेजस्वी सातपुते यांनी पोलिस हवालदार संताजी जाधव यांना निलंबित केले.
एसपी यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, ‘तुमच्या वर्तनाने पोलिस खात्याची प्रतिमा मलिन झाली आहे. तुम्ही तुमच्या पदास अशोभनिय लांच्छनास्पद गैरवर्तन करुन गंभीर स्वरुपाची कसुरी केली आहे.’ यामुळे सेवेतून निलंबित करण्यात येत आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |