01:02pm | Mar 22, 2021 |
बुध: राजकारणात समाजकारणाची आस असणार्या लोकांचे कार्य हे शाश्वत विकासाची गंगा निर्माण करणारे असते, असे म्हटल्यास वावगे ठरत नाही. असे कार्य हे भावी पिढीसाठी आदर्श निर्माण करते ही वस्तुस्थिती आहे. अशाच ध्येयवादी धोरणासाठी परिचित असणारे बुधाच्या लोकनियुक्त सरपंच यांनी केलेल्या पारेषण मुक्त ग्रामपंचायत या कामाची प्रशंसा आज खटाव तालुक्यात होत आहे.
खटाव तालुक्यातील बुध गावच्या ग्रामसचिवालय इमारतीमध्ये ग्रामपंचायत कार्यालय, भु-संपादन विभागाची कार्यालये, गाळे तसेच गावकामगार तलाठी व मंडलाधिकारी कार्यालय आहेत. या सर्व कार्यालयाचे लाईट बील महिना अखेरीस 3-4 हजारांवर येत असे. तसेच ग्रामीण भागात लोडशेडिंगचा प्रश्न निर्माण होत असल्यामुळे लोकांना सरकारी दाखले मिळण्यास विलंब होत असे यावर उपाय म्हणून सरपंच अभयसिंह राजेघाटगे आणि बुध गावचे सुपुत्र व महाराष्ट्राचे वित्त विभागाचे उपसचिव वैभव राजेघाटगे याच्या संयुक्त प्रयत्नाने उर्जा विभाग अंतर्गत सौर ऊर्जाचे युनिट बसविण्यात आले आहे. MED अंतर्गत या योजनेनुसार 5 KW क्षमता असलेला 5 लक्ष रू किंमतीचे हे युनिट 100 टक्के अनुदानित आहे. यामुळे ग्रामपंचायतीचा वार्षिक 60 हजार रूपये फायदा झाला आहे. तसेच सौर ऊर्जा ही एक शाश्वत उर्जा असल्यामुळे नागरिकांना दाखले व अन्य कामांसाठी आता लाईट वाट पाहत बसावे लागणार नाही. कारण आता बुध ग्रामपंचायत कायम उजेडात राहणार आहे.
या कामासाठी सरपंच अभयसिंह राजेघाटगे, उपसरपंच मनिषा कुंभार, ग्रामविकास अधिकारी शशिकांत माने, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले असून त्यांचे कौतुक संपूर्ण खटाव तालुक्यात होत आहे. बुध ग्रामपंचायत ही खटाव तालुक्यातील पहिलीच पारेषणमुक्त ग्रामपंचायत आहे.
यापुढील काळात बुध गावासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयलशील राहणार असल्याचेही यावेळी सरपंच अभयसिंह राजेघाटगे यांनी सांगितले.
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |
अजित वाकनीस यांचे निधन |