11:23am | Dec 23, 2020 |
वॉशिंग्टन : अमेरिकेत कोरोनाच्या संसर्गाचे थैमान सुरू आहे. कोरोनाबाधितांची संख्या एक कोटी 60 लाखांहून अधिक झाली आहे. तर, मृतांची संख्याही तीन लाखांहून अधिक झाली आहे. 20 डिसेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार, मागील आठवड्यात अमेरिकेत कोरोनामुळे दर 33 सेकंदाला एकाचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. या सात दिवसांत अमेरिकेत 18 हजार जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. मागील आठवड्यातील मृतांची संख्या ही आधीच्या आठवड्याच्या तुलनेत 6.7 टक्के अधिक आहे. मागील आठवड्यात अमेरिकेत कोरोनाच्या नवीन प्रकरणात एक टक्क्यांनी घट झाली आहे. कॅलिफोर्निया, रोड आयर्लंड आणि टेनेसी या भागात सर्वाधिक कोरोनाबाधित आढळले. तर, आयोवा, साउथ डकोटा आणि रोड आयर्लंड याभागात सर्वाधिक मृतांची नोंद करण्यात आली.
अमेरिकेतील 50 पैकी 31 राज्यांमध्ये संसर्गाचा दर हा 10 टक्क्यांहून अधिक आहे. आयोवा आणि आयडेहो सारख्या भागात हा दर 40 टक्क्यांहून अधिक आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, 5 टक्क्यांहून अधिक संसर्गदर असल्यास चिंतेची बाब आहे.
अमेरिकेत कोरोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू असून लोकांनाही आवाहन केले जात आहे. आरोग्य अधिकार्यांनी लोकांना सुट्टीच्या दिवशी प्रवास न करण्याचे आवाहन केले होते. मात्र, शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी अमेरिकेच्या विमानतळांवर गर्दी दिसून आली. या तीन दिवसांत 32 लाख प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात आली. लोकांनी सुट्टी साजरी करण्यासाठी प्रवास टाळला पाहिजे मत अधिकार्यांनी व्यक्त केले. मोठ्या प्रमाणावर लोक बाहेर पडल्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याचा धोका आहे.
अमेरिकेत कोरोना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. मात्र, वेगाने बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे परिस्थिती चिघळण्याची शक्यता आहे.
कोरोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकेत पुढील महिन्यांपासून सर्वसामान्य नागरिकांना लस देण्यास सुरुवात होणार आहे. सध्या आरोग्य कर्मचार्यांसह संसर्गाचा सर्वाधिक धोका असलेल्यांना लस दिली जात आहे. अमेरिकेत सध्या फायजर-बायोएनटेक आणि मॉडर्नाची लस दिली जात आहे.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |