01:55pm | Oct 13, 2020 |
बुध: कोरोना संकटकाळात उल्लेखनीय कार्य सामाजिक कार्य करणार्या आप्पासाहेब घोरपडे व छायाताई भगत यांना ‘कोरोना योध्दा’ने सन्मानित करण्यात आले. पुणे येथील शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर देशातील सर्व क्षेत्रात अग्रेसर असणार्या महाराष्ट्र राज्यातील रुग्णांना कॅन्सर, थैलेसिमिया, नवीन बालकांना तसेच कोरोना सारख्या रूगणांना रक्ताचा तुटवडा निर्माण झाला. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य तटकरे,खासदार श्रीकांत शिंदे आदींनी रक्तदान करण्याचे रक्तदात्यांना आवाहन केले. या केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शिवशंभू ब्लड फौंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष शिवश्री भूषणदादा सुर्वे, राज्य संपर्क प्रमुख आप्पासाहेब घोरपडे यांनी सर्वात प्रथम महाराष्ट्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यात भव्य रक्तदान शिबीर घेऊन नवा विक्रम प्रस्थापित केला.
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांनी विशेष ऋण व्यक्त केले. दरम्यानच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही वाढत असल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. याच गोष्टीची दखल घेत संपूर्ण महाराष्ट्रात रक्तदान हेच खरे श्रेष्ठ दान मानून एका फोनवरती सुद्धा रक्त उपलब्ध होऊ शकते ही संकल्पना श्री शिवशंभू ब्लड फौंडेशन महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख आप्पासाहेब घोरपडे यांनी गोर गरीब व गरजू व्यक्तीला मोफत रक्त मिळावे यासाठी सुरू केली.
रक्तदाना सारखे महान कार्य सुरू करून समाजातील गरजू रुग्णांना अखंडपणे रुग्णसेवा व दिलासा देण्यासाठी श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शिवशंभू ब्लड फौंडेशन महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख, विश्व जन आरोग्य सेवा समिती सातारा जिल्हा प्रमुख व श्रीमंत घोरपडे सरकार प्रतिष्ठानच्या वतीने आप्पासाहेब घोरपडे यांनी पुढाकार घेतला. या कार्याची दखल घेऊन वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पुणे यांच्यावतीने पांडुरंग शिवाजीराव घोरपडे उर्फ आप्पासाहेब घोरपडे यांना ’कोरोना योद्धा’ म्हणून शिवसेना पुणे शहर प्रमुख संजयजी मोरे यांच्या शुभ हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
या उपक्रमाचे आयोजन वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेशजी चिवटे व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पुणे शहर प्रमुख व पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख राजाभाऊ भिलारे यांच्या पुणे येथील कार्यालयात करण्यात आले होते. या कार्यक्रमात कोरोना योद्धा पुरस्कार,अपंगासाठी तीन चाकी सायकल वाटप असा कार्यक्रम शिवसेना पुणे शहर प्रमुख संजयजी मोरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.या वेळी विश्राम बाग पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नादब्रम्ह ढोल पथकाचे प्रमुख अतुलशेठ बहेरे,समाजसेवक स्वप्निल फुगे, विश्व जन आरोग्य सेवा समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष छाया भगत,नागेश सातपुते,रूग्ण वाहिका चालक, पोस्टमन, प्लाझमा दान करणारे, कठिण काळात इंजेक्शन उपलब्ध करून देणारे, डॉक्टर, टेक्निशियन, आरोग्याचे बाळासाहेब टिळेकर ससुन हॉस्पिटल व नायडू हॉस्पिटल मधील रुग्ण सेवक अशा 18 जणांना कोरोणा योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |