08:03pm | Apr 13, 2021 |
कराड : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस परीक्षेत कराडचा चारुदत्त साळुंखे हा देशात अव्वल ठरला आहे. जिल्हा परिषद शाळा आणि कराडच्या शिवाजी हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण मराठी माध्यमातून घेवूनही त्याने सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
पाटण तालुक्यातील चाफळ हे चारुदत्त याचे मूळ गाव. त्याचे आई-वडील दोघेही कराडला शिवाजी हायस्कूलमध्ये शिक्षक आहेत. त्यामुळे त्यांचे वास्तव्य कराडमध्येच आहे. चारुदत्तचे प्राथमिक शिक्षण कराडच्या आदर्श प्राथमिक विद्यामंदिरमधून पूर्ण झाले. त्यानंतर पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण येथील शिवाजी हायस्कूलमधून झाले. चारुदत्तने त्याच्या हुशारीची चुणूक दहावीला 94.55 टक्के गुण मिळवून दाखवली होती. त्यानंतर त्याने पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी विशेष प्राविण्यासह मिळवली.
पुणे इंजिनियरिंग कॉलेजला असताना कॅम्पसमधून त्याला खासगी नोकरीच्या संधी आल्या होत्या. मात्र, त्याने त्या नोकर्या नाकारुन शासकीय सेवेत काम करण्याची तयारी ठेवली. चारुदत्तने अखिल भारतीय स्तरावर झालेल्या गेट 2020 परीक्षेत देशात 48 वा क्रमांक पटकवला होता. सध्या तो भाभा ऍटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये संशोधक म्हणून कार्यरत आहे. आता त्याने इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमध्ये देशात पहिला क्रमांक पटकावून कराडचे व पर्यायाने सातारा जिल्ह्याचे नाव देशात उज्वल केले आहे. चारुदत्तच्या या यशामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |