06:34pm | Feb 28, 2021 |
वडूज : सरपंच, उपसरपंच निवडी झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करून बेकायदेशीर जमाव जमवून सत्कार, सभारंभ केल्याप्रकरणी कान्हरवाडी (ता. खटाव) येथील नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंच, सदस्यांसह सोळाजणांवर वडूज पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी पोलीस अमंलदार योगेश सुर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कान्हरवाडीच्या सरपंच कांता चंद्रकांत येलमर, उपसरपंच महावीर शशिकांत जाधव, सदस्य संगीता वसंत जाधव यांच्यासह सतीश प्रभाकर येलमर, रामचंद्र सदाशिव येलमर, रामचंद्र महादेव येलमर, प्रदीप तात्यासो येलमर, यशवंत बाबुराव येलमर, शशिकांत बाबा जाधव, बाळू शामराव येलमर, हणमंत रामचंद्र येलमर, शंकर आत्माराम येलमर, आनंदा नामदेव जाधव, विजय उर्फ विज्या सदाशिव जाधव, बाळू लक्ष्मण चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, करोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी सातारा जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी संचारबंदीसह इतर काही कडक निर्बंध घातले आहेत. त्याचाच भाग म्हणून जिल्ह्यात चारपेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यास मनाई असून प्रत्येकाच्या तोडांला मास्क असणे बंधनकारक केले आहे. मात्र, संशयितांनी या आदेशाचा भंग करून दि.27 रोजी ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडी झाल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी करोनाच्या अनुषंगाने कोणतीही खबदारी न घेता तसेच सोशल डिस्टंन्स न पाळता सत्कार सभारंभ सोहळा आयोजित केला होता. यावेळी मायणी पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस अमंलदार बापूराव खांडेकर, योगेश सुर्यवंशी, नवनाथ शिरकुळे हे गस्त घालत कान्हरवाडी तेथे आले. त्यांनी वरील सर्व संशयितांची नावे लिहून त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 269,270,188 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
बड्या धेंडांची नावे वगळली?
कान्हरवाडी (ता. खटाव) येथे मायणी पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. मात्र, याच गावातील या कार्यक्रमाचे सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या फोटोवरून पोलिसांनी काहीजणांना कारवाईतून मोकळीक दिल्याचे दिसून येत आहे. केवळ सर्वसामान्यांवर कारवाई न करता फोटोत दिसणाऱ्या प्रत्येकावरच कारवाई करण्याचे धाडस मायणी पोलीस दाखवणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शिंदेवाडी येथे जुगार खेळणाऱ्या नऊ जणांकडून सुमारे पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त |
भैराबाचा पायथा परिसरात युवकाचे विष प्राशन |
मारहाण व विनयभंग प्रकरणी वकिलासह त्याच्या मित्रावर गुन्हा |
जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
रेमडेसीवीर इंजेक्शनच्या तुटवड्याला राज्य सरकारच जबाबदार |
या चिमण्यांनो, परत फिरा रे... |
सातार्यात काल निष्पन्न झालेल्या 1434 बाधितांचा अहवाल, 480 नागरिकांना डिस्चार्ज |
मुजोर वीजमंडळाच्या अधिकार्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : राम जाधव |
पुसेगावात अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नागरिकांची भ्रमंती |
स्टॉलवर वृत्तपत्र विक्रीस जिल्हाधिकार्यांची परवानगी |
एकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा |
विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा |
जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल |
विनाकारण फिरणार्या सहाजणांवर कारवाई |
प्रियांका मोहिते ने केले माउंट अन्नपूर्णा शिखर सर |
या चिमण्यांनो, परत फिरा रे... |
सातार्यात काल निष्पन्न झालेल्या 1434 बाधितांचा अहवाल, 480 नागरिकांना डिस्चार्ज |
मुजोर वीजमंडळाच्या अधिकार्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : राम जाधव |
पुसेगावात अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नागरिकांची भ्रमंती |
स्टॉलवर वृत्तपत्र विक्रीस जिल्हाधिकार्यांची परवानगी |
एकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा |
विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा |
जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल |
विनाकारण फिरणार्या सहाजणांवर कारवाई |
प्रियांका मोहिते ने केले माउंट अन्नपूर्णा शिखर सर |
संपत राजाराम जाधव यांचे निधन लसीमुळे नाही |
जिल्ह्यातील 38 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
सातार्यातील दारु अड्ड्यावर छापा |
मोबाईल चोरीप्रकरणी दोघांना अटक |
प्राध्यापकाच्या घरातून 37 हजारांचा ऐवज चोरीस |