12:56pm | Oct 17, 2022 |
वॉशिंग्टन : अमेरिकेतील वॉल स्ट्रिट जर्नल या वर्तमानपत्रात भारताच्या विरोधातील एक जाहिरात पहिल्या पानावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात भारताला लक्ष्य करताना गुंतवणुकीसाठी सगळ्यांत असुरक्षित देश असा भारताचा उल्लेख करण्यात आला आहे. एका संघटनेकडून देण्यात आलेल्या या जाहिरातीत भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह 14 जणांची नावेही देण्यात आली आहेत.
वॉंटेडचे पोस्टर जसे छापतात त्या प्रकारे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सीतारामन आणि अन्य ज्या लोकांची नावे त्यात छापण्यात आली आहेत ते लोक भारतातील घटनात्मक संस्थांचा राजकीय आणि उद्योग जगतातील विरोधकांना लक्ष्य करण्याकरता शस्त्रासारखा वापर करतात असा आरोप करण्यात आला आहे. गुंतवणूदारांनी गुंतवणुकीच्या दृष्टीने भारतापासून दूरच राहावे, असा सल्लाही त्यात देण्यात आला आहे.
अमेरिकेने भारतावर आर्थिक आणि व्हिसा प्रकरणात निर्बंध लादण्याची मागणीही जाहिरातीत करण्यात आली आहे. निर्मला सीतारामन सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असतानाच ही वादग्रस्त जाहिरात देण्यात आली आहे. यात ज्या लोकांवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे त्यात भारताचे सॉलीसीटर जनरल तुषार मेहता, अतिरिक्त सॉलीसीटर जनरल एन. वेंकटरमण, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हेमंत गुप्ता आणि व्ही. रामसुब्रमण्यम यांच्या नावांचा समावेश आहे. त्याशिवाय विशेष न्यायाधीश चंद्रशेखर, ईडीचे संजय कुमार मिश्रा आणि आर. राजेश, केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयचे आशिष पारीख तसेच ईडीचे ए. सादीक मोहम्मद यांची छायाचित्रे प्रसिध्द करण्यात आली आहेत.
दरम्यान, अर्थमंत्री अथवा भारत सरकारकडून याबाबत कोणतीही टिप्पणी देण्यात आलेली नाही. मात्र एक भारतीय असंतुष्ट व्यावसायिक रामचंद्रन विश्वनाथन आणि त्याच्या समर्थकांनी ही जाहीरात प्रसिध्द केली असल्याची माहिती पुढे आली आहे. उपग्रह आणि स्थळ प्रणालींच्या माध्यमातून मल्टीमीडियाला साम्रगी वितरीत करण्यासाठी जो मंच विकसित करण्यात आला होता त्या देवास कंपनीचे विश्वनाथन माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.
सातारा पोलिसांनी केली जिल्ह्यातील मोटार सायकल चोरी करणारी टोळी तडीपार |
गुढीपाडवा मोठ्या उत्साहात सातारा जिल्ह्यात साजरा |
मोदी सरकारच्या निषेधार्थ साताऱ्यात काँग्रेसची निदर्शने |
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ जागतिक दर्जाचे विद्यापीठ करण्याचे आव्हान पेलूयात |
अनैतिक संबंधांच्या कारणावरून फलटणमध्ये महिलेचा खून |
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून फलटण व माढा मतदार संघात ४ कोटींचा भरीव निधी |
सातारा शहरातून दुचाकीची चोरी |
विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवकाची गळफास घेऊन आत्महत्या |
दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
जाशी येथे खोऱ्याच्या दांड्याने महिलेला मारहाण |
स्विफ्ट आणि मालवाहतूक टेम्पोच्या धडकेमध्ये महिला जखमी |
ट्रॅक्टर अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
महिलेच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर गुन्हा |
दुचाकीची चोरी |
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून फलटण व माढा मतदार संघात ४ कोटींचा भरीव निधी |
सातारा शहरातून दुचाकीची चोरी |
विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवकाची गळफास घेऊन आत्महत्या |
दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
जाशी येथे खोऱ्याच्या दांड्याने महिलेला मारहाण |
स्विफ्ट आणि मालवाहतूक टेम्पोच्या धडकेमध्ये महिला जखमी |
ट्रॅक्टर अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
महिलेच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर गुन्हा |
दुचाकीची चोरी |
अपघातात नुकसान केल्याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
शेंद्रे येथे अनावधानाने गोळी सुटून कामगार जखमी |
शिवसेना जिल्हाप्रमुखांनी घेतली बँक व्यवस्थापकाची झाडाझडती |
जावली तालुक्यातील आडवी बाटली उभी करणार्यांविरोधात सायरन आंदोलन |
मारहाण प्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल |