10:52pm | Jul 31, 2020 |
सातारा : येथील हॉटेल मराठा पॅलेसमध्ये जुगार खेळताना आढळून आलेल्या अकरा जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी त्यांना गुरुवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून २ लाख ९० हजार ७०० रुपये रोख रक्कम, ८ मोबाईल, १ दुचाकी आणि जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की सातारा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे लॉकडाउन सूरु आहे. अशा परिस्थितीत सातारा शहरातील एका हॉटेलमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळाली. गुरुवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास गुन्हे प्रकटीकरण पथकाने जुगार अड्डा सुरू असणाऱ्या हॉटेल मराठा पॅलेस येथे छापा टाकला असता त्या ठिकाणी किरण विठ्ठल नलावडे रा. इंदिरानगर, विलासपूर, ता. सातारा. संजय दत्तात्रय लेवे. स्वप्निल चंद्रकांत काकडे दोघेही रा. सर्वोदय कॉलनी, गडकर आळी, सातारा. हेमंत शिवाजी चव्हाण रा. व्यंकटपुरा, सातारा. ओमकार रामचंद्र शिंदे रा. मंगळवार तळे, सातारा. उमर निशाण मोमीन रा. गुरुवार परज, सातारा. समीर कदम शेख यादोगोपाळ पेठ, सातारा. इम्तियाज अब्दुल सय्यद रा. गुरुवार पेठ, सातारा. अमोल जगन्नाथ चौगुले रा. मंगळवार पेठ, सातारा. धनंजय हिरालाल शिंदे रा. मोरया कॉलनी, पिरवाडी, खेड, ता. सातारा. हिरालाल शंकर शिंदे रा. आसगाव, ता. सातारा हे अकरा जण तेथे जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्याकडून २ लाख ९० हजार ७०० रुपये रोख रक्कम, ८ मोबाईल, एक दुचाकी आणि जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. या घटनेची नोंद सातारा शहर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |