09:13pm | Nov 17, 2021 |
फलटण : प्रशासकीय सेवेमध्ये प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या ढोले दांपत्याचे कोरोना काळातील कार्य अत्यंत प्रेरणादायी व जनसामान्यांना न्याय देणारे असल्याने ढोले दाम्पत्य खऱ्या अर्थाने कोरोना योद्धा असल्याचे मत राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष मुंबई व डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन ठाणे यांच्यातर्फे ठाणे येथील डॉक्टर काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात कोरोना योद्धा पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कोरोना योद्धा पुरस्कार फलटणच्या कन्या नवी मुंबईच्या अतिरिक्त आयुक्त सुजाता खाडे- ढोले व त्यांचे पती मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त दिलीपराव ढोले यांना देण्यात आला. यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, विधी व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे, खासदार श्रीकांत शिंदे, शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे आदी उपस्थित होते.
कोरोना काळामध्ये दिलीपराव ढोले व सुजाता ढोले यांनी वेळेचे बंधन न पाळता दिवस-रात्र लोकांच्या सेवेसाठी वाहून घेतले होते. प्रशासकीय यंत्रणा त्यांनी गतिमान केली होती. सुट्टी न घेता त्यांचे कामकाज सुरू होते. रुग्णांना उपचार तसेच आपल्या क्षेत्रामध्ये स्वच्छता, आरोग्य या गोष्टीवर त्यांनी बारकाईने लक्ष दिल्याने जनसामान्यांमध्ये या दांपत्याबद्दल आपुलकीची भावना आहे, प्रेम आहे. जनतेच्या मनातील ते खरे नायक आहेत. त्यामुळेच खऱ्या अर्थाने ते कोरोना योद्धा पुरस्कारासाठी हकदार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. व या पुरस्काराबद्दल ढोले दाम्पत्याचे अभिनंदन केले.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |