04:40pm | Dec 09, 2022 |
सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज आणि सातारा लोकसभा मतदारसंघाचे भाजपा खा.श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली येथे भेट घेऊन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्वारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भाजप खासदारांसह नरेंद्र मोदी यांच्या समवेत बैठक झाल्यानंतर त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल प्रत्येकाने विचारपूर्वक विधान करावे. शिवराय हे केवळ महाराष्ट्राचीच नव्हे तर देशाची अस्मिता आहे. देशात जसे राष्ट्रपती हे पद मोठे असते तसेच राज्यात राज्यपाल हे पद फार मोठे असते. सध्या भगतसिंह कोश्वारी हे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर कार्यरत आहेत. त्यांनी शिवरायांबद्दल अशा प्रकारचे विधान करणे अपमानास्पद आहे. त्यामुळे यावर लवकरात लवकर तोडगा निघणे गरजेचे आहे.
ते पुढे म्हणाले, दि.२३ नोव्हेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान होत आहे याबाबत पत्र लिहिले होते. राष्ट्रपतींनी ते पत्र गृहमंत्रालयाकडे पाठवले आहे. या पत्रात कोणत्याही राज्यात घडणारा एखादा प्रकार इतका वाढू नये की ज्यामुळे थेट निर्माण होईल अशी आपण मागणी केल्याचे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी सांगितले. महाराष्ट्रात सध्या तेढ निर्माण झाल्याची परिस्थिती आहे ती थांबून पुर्ववत शांततापूर्ण वातावरण निर्माण व्हावे, अशी मागणी आपण पंतप्रधानांकडे केली असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. राज्यपाल भगतसिंह कोश्वारी यांच्यावर कारवाई होणार याची खात्री असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले, पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्या प्रक्रियेनुसार कारवाई होईल. या विषयाला राजकीय दृष्टिकोनातून पाहू नका. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर प्रेम करणारे लोक अशा प्रकारांमुळे नाराज झाले आहेत. राज्यपालांनी तोलून मापून बोलायला हवे, अशा प्रकारची विधान वारंवार घडत आहेत. याकडे दुर्लक्ष केले जाईल असे कोणाला वाटू नये. कोणत्याही महापुरुषाबाबत असे घडले चांगले लक्षण नाही, असे सांगत राज्यपालांनी लोकांची माफी मागितली नाही याची खंत आहे असे मतही खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी यावेळी व्यक्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात या तीन राज्यांमधील राज्यसभेच्या भाजपच्या खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला एकूण तिन्ही राज्यांमधील २६ खासदार उपस्थित होते. उर्वरित खासदारांची कालांतराने बैठक होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
युवकाचे अपहरण करून त्याचा खून केलेले संशयित 36 तासात रत्नागिरी येथून जेरबंद |
गर तू मेरा नही हो सका, तो किसी और का होने नहीं दूंगी... |
वाढे फाटा येथील मारेकरी ताब्यात; सूत्रधार कोण? |
दोन लाखांचे दागिने घेऊन कारागीर पळाला |
एकाची 35 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
टेस्टिंग सर्टिफिकेटच्या आमिषाने सुमारे 97 हजारांना गंडा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
बैलगाडीतून पडून महिलेचा मृत्यू |
दहावीतील मुलांनी धाक दाखवण्यासाठी चक्क क्लासमध्ये नेला कोयता |
राज्यात आदर्शवत ठरतील असे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आदर्श शाळा तयार करा : पालकमंत्री शंभूराज देसाई |
हॉटेलमध्ये विसरलेले १४ तोळे दागिने मिळाले परत |
रेशनिंग दुकानदार केरोसिन परवानाधारक संघटनेचे जिल्हा प्रशासनाला निवेदन |
कराडचा उड्डाणपूल पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून हिरवा कंदील... |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
टेस्टिंग सर्टिफिकेटच्या आमिषाने सुमारे 97 हजारांना गंडा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
बैलगाडीतून पडून महिलेचा मृत्यू |
दहावीतील मुलांनी धाक दाखवण्यासाठी चक्क क्लासमध्ये नेला कोयता |
राज्यात आदर्शवत ठरतील असे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आदर्श शाळा तयार करा : पालकमंत्री शंभूराज देसाई |
हॉटेलमध्ये विसरलेले १४ तोळे दागिने मिळाले परत |
रेशनिंग दुकानदार केरोसिन परवानाधारक संघटनेचे जिल्हा प्रशासनाला निवेदन |
कराडचा उड्डाणपूल पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून हिरवा कंदील... |
खानापूरच्या युवकाचा परखंदीत निर्घृण खून; वाई तालुक्यात खळबळ |
तांब्याच्या तारेची चोरी |
नोकरीच्या आमिषाने तब्बल चार लाख 99 हजाराची फसवणूक |
युवतीच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा दाखल |
मध्यमवर्गीय, शेतकरी, गोरगरीबांना न्याय देणारा अर्थसंकल्प |