10:40pm | Sep 18, 2020 |
सातारा : जिल्ह्यात शुक्रवारी उच्चांकी 1280 नागरिकांना कोरोनातून ठणठणीत बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला. दिवसभरात 962 बाधित निष्पन्न झाले, तर 24 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच 1160 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
शुक्रवारी उच्चांकी 1280 नागरिकांना जिल्ह्यातील विविध रुग्णालये, कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमधून कोरोनामधून पूर्णपणे बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला. ही एक सकारात्मक बाब मानावी लागेल. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुक्तांचा आकडा 19 हजार पार करीत 19 हजार 57 वर पोहोचला आहे. जिल्ह्यात दिवसभरात 962 जण बाधित निष्पन्न झाल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 29 हजार 115 वर पोहोचला आहे. तसेच 24 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या आठशेचा आकडा पार करीत 807 वर पोहोचली आहे. याचबरोबर 1160 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
24 बाधितांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे प्रतापगंज पेठ येथील 65 वर्षीय महिला, सायगाव जावळी येथील 82 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ सातारा येथील 41 वर्षीय पुरुष, पाटण येथील 65 वर्षीय पुरुष, गोडोली सातारा येथील 56 वर्षीय पुरुष, सोनके कोरेगाव येथील 82 वर्षीय पुरुष, कर्वे कराड येथील 70 वर्षीय महिला, गोवे सातारा येथील 56 वर्षीय महिला, गोंदवले बु येथील 70 वर्षीय महिला, करंजखोप कोरेगाव येथील 74 वर्षीय पुरुष , वडूज ता. खटाव येथील 68 वर्षीय महिला, कसबा पेठ फलटण येथील 65 वर्षीय पुरुष, माणी ता. खटाव येथील 35 वर्षीय महिला, कामाठीपुरा सातारा येथील 51 वर्षीय पुरुष, विसापूर ता. खटाव येथील 85 वषीय परुष, लाखनगर ता. वाई येथील 72 वर्षीय पुरुष, इकसार ता. वाई येथील 46 वर्षीय महिला, मारुती नगर पोवई बुध ता. खटाव येथील 61 वर्षीय महिला, देगाव सोतारा येथील 69 वर्षीय पुरुष, तसेच उशिरा कळविलेले गोळेवाडी ता. कोरेगाव येथील 60 वर्षीय महिला व 80 वर्षीय पुरुष, मल्हार पेठ ,पाटण येथील 70 वर्षीय महिला, कुरोशी ता. महाबळेंश्वर येथील 55 वर्षीय पुरुष अशा एकूण 24 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
1160 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 34, उपजिल्हा रुग्णालय कराड 21, उपजिल्हा रुग्णालय फलटण 50, कोरेगाव 126, वाई 85, खंडाळा 74, रायगांव 106, पानमळेवाडी 212, मायणी 103, महाबळेश्वर 55, दहिवडी 41, खावली 45, तळमावले 26 व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड 182 असे एकूण 1160 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |