07:39pm | Jun 24, 2021 |
फलटण : ओबीसींच्या रद्द झालेल्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजप आक्रमक झाली आहे. हे आरक्षण पुन्हा मिळावे, यासाठी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली फलटण येथे शनिवारी (दि. 26) चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. क्रांतिसिंह नाना पाटील चौकात सकाळी 11 वाजता या आंदोलनास प्रारंभ होणार आहे.
भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली वाहण्यासाठी फलटण शहर व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी आणि विविध आघाडी व मोर्चाचे अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस भाजपचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, फलटण तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, अभिजित नाईक-निंबाळकर आदी उपस्थित होते. यावेळी जयकुमार शिंदे म्हणाले, सध्याचे सरकार नाकर्ते असून गतवेळच्या भाजप सरकारने घेतलेले चांगले निर्णय या सरकारच्या नाकर्तेपणामुळे रद्द झाल्यामुळे महाराष्ट्रातील सामान्य जनतेचे फार मोठे नुकसान झाले आहे. मराठा आरक्षण व ओबीसी आरक्षण आणि धनगर आरक्षणाबाबत राज्य सरकार दुटप्पीपणाची भूमिका घेत असून, आपल्या नाकर्तेपणाचे खापर केंद्र सरकारवर फोडण्याचा प्रयत्न करीत आहे. केंद्राने केलेल्या चांगल्या कार्याचे श्रेय मात्र राज्य सरकार स्वतःकडे घेत आहे. कोरोना लस कमी पडल्यास केंद्र सरकारच्या नावाने आरडाओरड केली जाते व त्याच केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध करून दिल्यास आम्ही लोकांना मोफत लस पुरवठा करून देऊ, अशा प्रकारच्या वल्गना राज्य सरकारचे प्रतिनिधी करतात.
या बैठकीस बाळासाहेब काशीद, सुनील जाधव, नानासहेब इवरे, राजेश शिंदे, राहुल शहा, वसिमभाई मणेर, सागर अभंग, किरण राऊत, संतोष सावंत, शशिकांत रणवरे, सोमनाथ एजगर, सुधीर जगदाळे, नितीन जगताप, तानाजी करळे, रियाजभाई इनामदार, मुक्ती शहा, उषा राऊत, विजया कदम, ज्योती इंगवले, विमल भुजबळ आदींसह भाजपचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते उपस्थित होते.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |