10:45pm | Oct 18, 2020 |
सातारा : सातारा जिल्हा न्यायालयात लिपिक व स्टेनो पदावर नोकरी लावतो असे सांगून फसवणूक केल्या प्रकरणी महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष संतोष मारुती आखाडे व अन्य एकावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आखाडे याना अटक केली असून त्याची न्यायालयाने पोलीस कोठडी नंतर आज न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
निवृत्त न्यायाधीश माझ्या ओळखीचे आहेत असे सांगून व संगनमत करून महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष संतोष मारुती आखाडे व निलेश रामदास थोरात (कोथरूड पुणे)या दोघांनी फिर्यादीच्या पत्नीला नोकरी लावण्याचे अमिष दाखवले. यासाठी अडीच लाख रुपये घेतल्याची फिर्याद कुमार पोपट धोत्रे रा. गुरे बझार झोपडपट्टी, सिद्धनाथ वाडी वाई यांनी जानेवारी २०२०मध्ये वाई पोलीस ठाण्यात दिली.
अशाच प्रकारे इतर तिघांची मिळून साडेनऊ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. नोकरी मिळत नाही म्हणून पैसे मागण्यास गेले असता संबंधितांनी दमदाटी व शिवीगाळ केल्याचेही फिर्यादीत नमूद केले आहे यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
धोत्रे यांनी फिर्याद दिल्यानंतर आखाडे व थोरात यांनी अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. परंतु न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर वाई पोलिसांनी आखाडे यांना अटक केली. न्यायालयाने त्यांची दोन दिवसाच्या पोलीस कोठडीत रवानगी केली नंतर आज न्यायालयीन कोठडी दिली आहे. दरम्यान निलेश थोरात फरारी आहेत. याबाबत अजून कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी वाई पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी केले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक राजेंद्र कदम करत आहेत.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |