12:32pm | Jul 31, 2020 |
सातारा: जी मुले खेळात चमकदार कामगिरी करतात ती शिक्षणात मागे पडतात, असा समज अनेकांचा असतो. मात्र हा गैरसमज अनेक एका बॉक्सरभाईने दूर केला आहे. बॉक्सिंग क्रीडाप्रकारात राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर सातत्याने चमकदार कामगिरी करणार्या आयुष अमर मोकाशी याने इयत्ता 10 वीच्या परीक्षेत 91.80 टक्के गुण मिळवून उज्वल यश संपादन केले. खेळात आणि शिक्षणातही चमकणार्या या बॉक्सरभाई वर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
येथील गुरुकुल स्कुलचा विध्यार्थी असलेला आयुष मोकाशी हा सातारा बॉक्सिंग अकॅडमीत बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेत आहे. गुरुकुल शाळेकडून खेळताना त्याने राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर शाळेचे, सातारा जिल्ह्याचे, कोल्हापूर विभाग आणि महाराष्ट्राचे नाव उज्वल केले आहे. शालेय आणि महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेच्या विविध स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करून त्याने अनेक पदकांची कामे केली आहे. खेळाकडे लक्ष केंद्रीत करतानाच त्याने अभ्यासाकडेही दुर्लक्ष केले नाही. त्याचाच प्रत्यय नुकत्याच झालेल्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत आला.
स्पर्धांसाठी तीन- तीन महिने शाळेपासून दूर राहणार्या आयुष ने दहावीच्या परीक्षेत 91.80 टक्के गुण मिळवून सर्वांनाच अचंबित करून टाकले. या यशाबद्दल आयुष याचे आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले, गुरुकुल शिक्षण संस्थेचे प्रमुख राजेंद्र चोरगे आणि सर्व शिक्षक, सातारा बॉक्सिंग अकॅडमीचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सागर जगताप, सर्व पदाधिकारी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |

अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |