08:46pm | May 25, 2023 |
सातारा : सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर कारभाऱ्यांची गुरुवारी निवड झाली. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विक्रम पवार यांना पुन्हा एकदा सभापतीपदाची संधी दिली आहे, तर उपाध्यक्षपदी मधुकर पवार यांची वर्णी लागली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून शंकर पाटील यांनी काम पाहिले. या निवडीनंतर अजिंक्य पॅनेलने फटाक्यांची आतिषबाजी करत गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला.
सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ३० एप्रिल रोजी झाली होती. या निवडणुकीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील अजिंक्य पॅनलने ३० वर्षांपासूनची सत्ता कायम राखली. तसेच विरोधी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पॅनलचा सुफडासाफ करत सर्व १८ जागांवर दणदणीत विजय मिळवला होता. या निवडणुकीत पॅनेलचे रमेश विठ्ठल चव्हाण, धनाजी जाधव, राजेंद्र महादेव नलावडे, मधुकर परशुराम पवार, विक्रम लालासो पवार, विजय उत्तम पोतेकर, भिकू भाऊ भोसले, वंदना किशोर कणसे, आशा मंगलदास गायकवाड, इसूब शमशुद्दीन पटेल, दत्तात्रय लक्ष्मण कोकरे, आनंदराव कल्याणराव कणसे, अरुण बाजीराव कापसे, शैलेंद्र राजाराम आवळे, संजय ज्ञानदेव पवार, अमिन शकूर कच्छी, बाळासाहेब यशवंत घोरपडे, अनिल बळवंत जाधव हे निवडून आले होते.
गुरुवारी बाजार समिती सभापती आणि उपसभापतींची निवड झाली. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शंकर पाटील यांनी एकमेव अर्ज प्राप्त होताच उभयतांच्या नावांची घोषणा केली यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी विक्रम पवार यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवला. त्यामुळे विक्रम पवार यांना दुसऱ्यांदा सभापतीपद मिळाले आहे. तर उपसभापतीपदी मधुकर पवार यांना संधी देण्यात आली. विक्रम पवार हे महामार्गाच्या पश्चिम बाजुचे तर मधुकर पवार हे पूर्व भागातील आहेत. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजेंनी दोन्ही भागात प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली आहे.
सातारा बाजार समिती सभापतीपदी विक्रम पवार तर उपसभापतीपदी मधुकर पवार यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन करण्यात येत आहे.
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |