09:58pm | Jun 02, 2020 |
सातारा : हवामान विभागाच्या सूचनेनुसार महाराष्ट्रात कोकण विभागात अरबी समुद्र किनाऱ्यावर 1 जून ते 4 जून कालावधीत निसर्ग चक्रीवादळ धडकणार असल्याबाबत हवामान खात्याने इशारा दिला आहे. या वादळाचा परिणाम सातारा जिल्ह्यातही होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने नुकसान होण्याची शक्यता गृहीत धरुन तसेच महाबळेश्वर, जावळी, वाई आणि पाटण या तालुक्याला विशेष सतर्क राहावे.या बाबत सर्व विभागांनी सतर्क राहून आपल्या विभागाशी सर्व त्या उपाययोजना राबविण्याच्या सुचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिल्या आहेत.
संभाव्य ‘निसर्ग’ या वादळाचा परिणाम सातारा जिल्ह्यातही होण्याची शक्यता नाकारता येत नाही, यामुळे संभाव्य अतिवृष्टी, वादळ-वारे होऊन झाडांची मोठ्या प्रमाणात पडझड होणे, विद्यूत खांब, तारांचे नुकसान होणे, वीज पूरवठा खंडीत होणे, संपर्क यंत्रणा खंडीत होणे, वाऱ्यांमुळे घर पडझड किंवा इतर बाबींचे नुकसान होण्याची शक्यता गृहीत धरुन सर्व विभागांनी सतर्क राहून आपल्या विभागाशी सर्व त्या उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. यानुसार पुढील आवश्यक त्या सुचनांचे पालन करावे असे जिल्हाधिकाऱ्यांनी सूचित केले आहे. सर्व विभागप्रमुख व त्यांच्या अधिपत्याखालील अधिकारी-कर्मचारी यांनी मुख्यालयात हजर रहावे, कोणत्याही कारणास्तव मुख्यालय सोडू नये. या वादळाबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांना सूचित करुन सतर्क राहण्याबाबत सूचना द्याव्यात. सार्वजनिक बांधकाम विभागाने संभाव्य झाडे पडणे, रस्ते बंद होणे व इतर अपघात याबाबत विभागनिहाय सूक्ष्म नियोजन करुन आवश्यक ती यंत्रसामुग्री व मनुष्यबळ तत्पर ठेवावे. विद्यूत विभागाने विद्युत खांब, तारा, वादळामुळे नुकसान झालेस झोननिहाय पथके तैनात ठेवून वीज पुरवठा त्वरीत पूर्ववत करण्याबाबत उपाययोजना राबवाव्यात. वादळामुळे संपर्क यंत्रणा नादुरुस्त झाल्यास बीएसएनल व संबंधित विभागांनी तात्काळ दुरुस्ती करावी अथवा पर्यायी व्यवस्था उपलब्ध ठेवावी. कृषी विभागाने सर्व शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे पूर्वकल्पना देवून सतर्क राहण्याबाबत अवगत करावे. पोलीस विभागाने संभाव्य वादळामुळे वाहतूक खंडीत झाल्यास वाहतूक पूर्ववत करण्याबाबत नियोजन करावे.
विशेष सतर्कता
विशेषत: सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, जावळी व पाटण तालुक्यातील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी अशा सूचनाही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिल्या.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |