01:10pm | May 26, 2022 |
मुंबई : शिवसेनेचे नेते एकापाठोपाठ एक अडचणीत येताना दिसत आहेत. सक्तवसुली संचलनालयाने पक्षाचे माजी नगरसेवक यशवंत जाधव यांच्या कुटुंबाच्या मालिकीच्या दुबईतील कंपनीची चौकशी सुरू केली आहे. जाधव यांनी स्थापन केलेल्या कंपनीच्या खात्यात करोनाच्या काळात पाच कोटी रुपये जमा करम्यात आले होते. यातील अर्धी रक्कम रोख स्वरुपात जमा करण्यात आली होती.
या प्रकरणी ईडीने जाधव आणि त्यांच्या दोन मुलांना मंगळवारी समन्स पाठवले होते. ईडीच्या समन्सकडे जाधव यांनी पाठ फिरवली पण त्यांच्या एका मुलाने ईडीकडे जाब नोंदवलाय. ईडीकडून आता नव्याने समन्स काढला जाण्याची शक्यता आहे. जाधव यांच्या मुलाच्या नावावर दुबईत स्थापन झालेली Synergy Ventures कंपनीची गेल्या वर्षी आयकर विभागाने चौकशी सुरू केली होती. ही चौकशी सुरू केल्यानंतर संबंधित कंपनी बंद करण्यात आली होती. या कंपनीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू आहे. ईडी आणि आयकर विभागाला असा संशय आहे की बीएमसीच्या स्थायी संमितीचे चेअरमन असताना जाधव यांनी हवालाच्या माध्यमातून दुबईतील कंपनीत पाच कोटी रुपये जमा केले होते. या प्रकरणी जाधव यांनी अद्याप प्रतिक्रिया दिली नाही. या शिवाय जाधव यांनी अमेरिका आणि कॅनडा येथील दोघा व्यक्तींना प्रत्येकी ३५ लाख रुपेय हवालाच्या माध्यमातून दिले होते. याचा तपास देखील ईडीकडून सुरू आहे.
जाधव २०१७ साली नगर सेवक झाले. त्यानंतर पुढील वर्षी त्यांच्याकडे स्थायी समितीचे चेअरमनपद आले. ही समिती मुंबईतील महत्त्वाच्या सर्व प्रकल्पांना अर्थपुरवठा मंजूर करत असते. यासाठी १२ हजार कोटी इतका निधी असतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २०१८ साली स्थापन झालेल्या कंपनीत काही पैसे हे कायदेशीर मार्गाने भरण्यात आले. त्यानंतर हॉगकॉग मार्गे काही पैसे कंपनीच्या खात्यात आले. २०२० आणि २०२१ मध्ये स्थानिक चलनात २ कोटी इतकी रक्कम कंपनीच्या खात्यात भरण्यात आली. जाधव यांनी असा दावा केलाय की त्यांनी मिळवलेले उत्पन्न हे सल्लागार व्यवसायातून कमावले आहे. पण ईडी आणि आयटी अधिकाऱ्यांना यात संशय वाटतो.
फडणवीस-शिंदे यांचा शपथविधी आजच होणार |
बाळासाहेबांची शिवसेना आम्ही गगनाला गवसणी घालण्याइतपत मोठी करु |
शुक्रवार १ जुलै २०२२ पासून लागू होणार ११ नवे नियम |
मृत कन्हैय्या लालच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी 24 तासांत 1 कोटीचा निधी |
उद्धव ठाकरे च्याविषयी जनमानसात सहानुभूतीची एक प्रचंड लाट |
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचा आम्हालाही आनंद नाही, पण परिस्थितीच अशी उद्भवली |
नव्या मंत्रिमंडळात साताऱ्यातील कोणाची वर्णी लागणार |
भाजप आणि शिंदे गट यांची आधीपासूनच अलिखित छुपी युती |
उद्धव ठाकरेंनी पक्ष वाचवण्यासाठी सत्ता गमावली |
बालविवाह करुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; चौघांवर गुन्हे |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
4 लाख 30 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सोनके येथे सुमारे 73 हजारांची वीजचोरी; दोघांवर गुन्हे |
कराड येथून 1 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस |
अपघात प्रकरणी चौघांवर गुन्हे |
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचा आम्हालाही आनंद नाही, पण परिस्थितीच अशी उद्भवली |
नव्या मंत्रिमंडळात साताऱ्यातील कोणाची वर्णी लागणार |
भाजप आणि शिंदे गट यांची आधीपासूनच अलिखित छुपी युती |
उद्धव ठाकरेंनी पक्ष वाचवण्यासाठी सत्ता गमावली |
बालविवाह करुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; चौघांवर गुन्हे |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
4 लाख 30 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सोनके येथे सुमारे 73 हजारांची वीजचोरी; दोघांवर गुन्हे |
कराड येथून 1 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस |
अपघात प्रकरणी चौघांवर गुन्हे |
जिल्ह्यातून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण |
शेतकऱ्यांनी अद्ययावत कृषी तंत्रज्ञान आत्मसात करून शेती करावी : राहुल जितकर |
भाजपच्या महिला व युवक संपर्क प्रमुखांची पनवेल येथे बैठक संपन्न |
किर्लोस्कर पॉवर टिलर्सच्या माध्यमातून शेतीमध्ये घडवून आणत आहे क्रांती |
मलकापूर नगरपंचायतीतील निधी अपहार प्रकरणाची होणार चौकशी |