सातारा : सैदापूर ता.सातारा येथील बिअर शॉपीचे शटर उचकटून दुकानातून तब्बल 24 हजार रुपये किंमतीची दारु व रोख 4 हजार रुपये चोरणार्या टोळीला सातारा तालुका पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने (डीबी) अटक केली. संशयितांकडून पोलिसांनी दारुसाठा जप्त केला असून संशयित सराईत असल्याची माहिती समोर आली आहे. संशयित सातारा व कोरेगाव तालुक्यातील आहेत.
अर्जुन नागराज गोसावी (रा.सैदापूर), विपुल तानाजी नलवडे (रा.करंजे), ओंकार पिलाजी पवार (रा.रणदुलाबाद ता.कोरेगाव) अशी संशयितांची नावे आहेेत. याप्रकरणी राम दशरथ इंदलकर (वय 35, रा.कळंबे ता.सातारा) यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार यांची बिअर शॉपी आहे. दि. 16 रात्री अज्ञात चोरट्यांनी बिअर शॉपी फोडून दुकानातून दारुच्या बाटल्या व रोख रक्कम चोरुन नेली. सकाळी ही घटना समोर आल्यानंतर याबाबतची माहिती तालुका पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन तपासाला सुरुवात केली.
डीबीचे पथक तपास करत असताना संशयितांची माहिती मिळाली. पोलिसांनी संशयितांकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत संशयितांना बोलते केल्यानंतर त्यांनी दारु लपवून ठेवलेली जागा दाखवली. पोलिसांनी ती दारु जप्त केली व संशयितांना ताब्यात घेतले. संशयितांचे रेकॉर्ड तपासले असता ते सराईत असल्याचे समोर आले.
पोनि सजन हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार दादा परिहार, सुजीत भोसले, सागर निकम, सतीश पवार, नितीराज थोरात यांनी कारवाईत सहभाग घेतला.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |