04:18pm | Dec 16, 2020 |
कराड: गेली 22 वर्षांपासून दिमाखात साजरा होणारा विजय दिवस यंदा कोरोना संकटाच्या पाश्वर्भमीवर साधेपणाने साजरा करण्यात आला. छोटेखानी झालेल्या या कार्यक्रमात विविध मान्यवरांसह उपस्थितांनी सोशल डिस्टंसिंग पाळत विजय चौकातील विजय स्तंभास आणि यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळास अभिवादन केले.
भारतीय सैन्यदलानाने बांग्लामुक्ती संग्रामात मोठा विजय प्राप्त केला. त्याप्रित्यर्थ निवृत्त कर्नल संभाजीराव पाटील यांच्या संकल्पनेतून गेली 22 वर्षे येथे विजय दिवस मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येतो. भारतीय सैन्यदलाच्या विजयाचे साक्षीदार असेलेल्या कर्नल पाटील यांच्या पुढाकारातून येथील छत्रपती शिवाजी स्टेडीयम व परिसरात दरवर्षी विजय दिवस समारोह समितीच्यावतीने भारतीय सैन्यदलाच्या सहकार्याने दि. 13 ते दि.16 डिसेंबर दरम्यान विजय दिवस समारोहाचे आयोजन करण्यात येते. देशात दिल्लीनंतर फक्त तो कराडमध्ये साजरा केला जातो. त्यामुळे त्याला मोठे महत्व आहे. विजय दिवस समारोहासाठी दरवर्षी लष्करी शस्त्रास्त्र, जवान, बॅण्डपथक, श्वानपथक आदींच्या चित्तथरारक कसरतींचेही आयोजन केले जाते.
मात्र यंदा कोरोनाचे मोठे संकट उभे आहे. त्यावर सध्यातरी सोशल डिस्टन्सिंग एवढाच पर्याय आहे. त्याचा विचार करुन विजय दिवस समारोह समितीच्यावतीने यंदाचा विजय दिवस समारोहाचा मोठा कार्यक्रम स्थगित करण्यात आला आला. मात्र विजय दिवसानिमित्त विजय स्तंभास आणि जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी खासदार श्रीनिवास पाटील, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, निवृत्त कर्नल एम.डी.कुलकर्णी, नगरसेवक सौरभ पाटील, नियोजन सभापती विजय वाटेगावकर, लेफ्टनंट कमांडर दिग्वीजय जाधव, ऑनररी लेफ्टनंट बाबुराव कराळे, दिलीप चव्हाण, सलीम मुजावर, अंशुमन पाटील, ए.आर. पवार, विजय दिवस समितीचे अरुण जाधव, विनायक विभुते, चंद्रकांत जाधव, विलासराव जाधव, प्रा.बी.एस.खोत, प्रा.रजनीश पिसे, प्रा.जालींदर काशिद, रमेश पवार, दिलीप पाटील, विष्णु पाटसकर, रत्नाकर शानभाग, हेमंत पवार, भरत कदम, मिनल ढापरे, पौर्णिमा जाधव, मिनाक्षी जाधव, अरुणा जाधव, साधना राजमाने, आसमा इनामदार, सतीश बेडके, सुनिल कणसे, दिपक कणसे, यांनी विजय स्तंभास अभिवादन केले. शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक काकासो करबंळेकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. कराड नगरपालिका व शहर पोलिसांनी या कार्यक्रमास सहकार्य केले.
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |