01:54pm | Oct 24, 2020 |
वॉशिंग्टन : कोरोना संकट जगाच्या मानगुटीवरून उतरण्याचे नाव घेत नसल्याचे धक्कादायक चित्र समोर येवू लागले आहे. अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरानावर नियंत्रण मिळवल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात परिस्थिती मात्र अधिकच गंभीर असल्याचे समोर येत आहे. अमेरिकेत एकाच दिवसांत जवळपास 80 हजार तर फ्रान्समध्ये एकाच दिवसात 42 हजार बाधित आढळले आहेत. ब्रिटनमध्येही काही भागांमध्ये कठोर लॉकडाउन लागू करण्यात आले आहे.
करोनाच्या संसर्गामुळे अमेरिकेत आतापर्यंत दोन लाख 29 हजार 284 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 87 लाख 46 हजारजणांना बाधा झाली आहे. अमेरिकेतील संसर्गजन्य आजार तज्ज्ञ डॉ. अँथोनी फाऊसी यांनी संपूर्ण अमेरिकेत मास्क घालणे सक्तीचे करण्याची वेळ आली असल्याचे म्हटले आहे. करोनापासून बचाव करण्यासाठी मास्कचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.
तर, युरोपमध्ये करोनाची दुसरी लाट आली आहे. फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. फ्रान्समध्ये आतापर्यंत 34 हजार 508 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. ब्रिटनमध्येही वाढत्या करोनाला रोखण्यासाठी सरकारने काही भागात लॉकडाउनचे कठोर नियम लागू केले आहेत. वेल्समध्ये पूर्णपणे लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. ग्रेटर मॅनचेस्टर, लिव्हरपूल सिटी आणि लँकशायरमध्ये लॉकडाउन लागू करण्यात आला आहे.
तर, दुसरीकडे करोनाबाधितांची संख्या वाढत असताना युरोपीय देशांची काळजी आणखी एका कारणामुळे वाढली आहे. युरोपात करोनाची दुसरी लाट आली असताना करोनाबाधितांमध्ये वृद्धांची संख्या मोठी असल्याचे समोर आले असल्याचे ’सीएनएन’ने म्हटले आहे. युरोपीयन सेंटर फॉर डिजीस प्रीव्हेंशन अॅण्ड कंट्रोलने याबाबतचा इशारा जारी केला आहे. जवळपास 13 युरोपीयन देशांमध्ये 65 वर्ष व त्याहून अधिक वयाच्या नागरिकांमध्ये संसर्ग फैलावत असल्याचा इशारा देण्यात आला आहे. फ्रान्समध्ये मागील सहा आठवड्यात 65 व त्यावरील अधिक वयांच्या बाधितांची संख्या तीनपटीने वाढली आहे.
त्रिमली येथून गॅस सिलेंडर लंपास |
जिहे नजिक अपघातात एक जखमी |
ट्रकमधून 18 लाख रुपयांची वेलची लंपास |
बेदरकारपणे कार चालविणार्या एकावर गुन्हा |
सातारा येथे चेन स्नॅचिंगप्रकरणी दोघांवर गुन्हे |
विवाहाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार |
सातार्यात जुगार अड्ड्यावर छापा |
जिल्ह्यात दारु अड्ड्यांवर छापे |
जिल्ह्यात तिघांची गळफास घेवून आत्महत्या |
बांधकाम भवन बाहेर अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला |
पिसाळलेला कुत्रा चावल्याने दोघांचा मृत्यू |
अंबेदरे येथे मारहाणप्रकरणी चौघांवर गुन्हे |
नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात जयंती साजरी |
जिल्ह्यात दोन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
उस उत्पादकांना सर्वाधिक नफा मिळण्यासाठी शेती अधिकार्यांनी तत्पर रहावे : ना. बाळासाहेब पाटील |
विवाहाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार |
सातार्यात जुगार अड्ड्यावर छापा |
जिल्ह्यात दारु अड्ड्यांवर छापे |
जिल्ह्यात तिघांची गळफास घेवून आत्महत्या |
बांधकाम भवन बाहेर अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला |
पिसाळलेला कुत्रा चावल्याने दोघांचा मृत्यू |
अंबेदरे येथे मारहाणप्रकरणी चौघांवर गुन्हे |
नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात जयंती साजरी |
जिल्ह्यात दोन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
उस उत्पादकांना सर्वाधिक नफा मिळण्यासाठी शेती अधिकार्यांनी तत्पर रहावे : ना. बाळासाहेब पाटील |
68 जण बाधित; 2 बाधितांचा मृत्यू |
डंपरच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू |
'जनकल्याण' व 'तीर्थक्षेत्र' आघाड्यांच्या राजकीय आखाड्यात, विषय समित्यांच्या निवडी प्रशासनाच्या कचाट्यात |
जीएसटी भवन कार्यालयाचे उद्घाटन |
खासगी सावकाराच्या भूमिकेतून मुख्यमंत्र्यांनी बाहेर पडावे |