महाबळेश्वर : येथे मावळत्या सूर्याचे (सनसेट) फोटो काढण्याची हौस चांगलीच अंगलट आलेली आहे. महाबळेश्वर येथील प्रसिध्द असलेले निसर्गरम्य सनसेटचे छायाचित्र काढण्याचा मोह 14 वर्षीय मुलाला चांगलाच महागात पडला. फोटो काढण्याच्या नादात दरीत कोसळून मुलगा दुखापतग्रस्त झाला आहे. ही धक्कादायक घटना महाबळेश्वर येथे असलेल्या लॉडविक पॉईंटला घडली आहे. आदित्य जाधव असे युवकाचे नाव आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, महाबळेश्वर येथील लॉडविक पॉइंटवर फोटो काढताना 14 वर्षीय तरुण दरीत कोसळल्याने या अपघातात तो गंभीर जखमी झाला आहे. सनसेट दृश्याचे फोटो काढताना तोल जाऊन अचानक तो दरीत कोसळला होता. या घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर ट्रेकर्स आणि सह्याद्री ट्रेकर्सने शर्थीचे प्रयत्न करून युवकाला बाहेर काढले. जखमी युवक अवस्थेत असल्याने त्याला पुढील उपचारासाठी पुणे येथे खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
पर्यटकांनी धोका पत्करुन अशी कुठलीही कृत्य करु नये
दरी-खोऱ्यात ट्रेकिंगला जाऊन धोकादायक सेल्फी किंवा फोटो काढण्याचा हल्ली ट्रेण्ड आला आहे. सोशल मीडियावर अधिकाधिक लाईक्स मिळवण्याच्या प्रयत्नात अनेक हौशी ट्रेकर्स नसती धाडसं करुन फोटोग्राफी करतात. माञ, पर्यटकांनी धोका पत्करुन अशी कुठलीही कृत्य करु नयेत, ज्यामुळे तुमच्या जीवावर बेतेल, असे आवाहन पोलीस आणि महाबळेश्वर पालिका प्रशासनाने केले आहे.
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |

राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |