सातारा : निसर्गाचा समतोल राखण्यासाठी सामजिक वनीकरण विभागाने मोठे योगदान दिले आहे. त्याचाच भाग म्हणून आझादी का अमृत महोत्सव निमित्त रहिमतपूर येथील आदर्श विद्यालयात हरित क्रांती घडवून वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये शेकडो विद्यार्थ्यांना हरित शपथ देण्यात आली.
कोरेगाव तालुक्यातील सामाजिक वनिकरण विभागाच्या कोरेगाव परिक्षेत्राच्या वतीने 'आझादी का अमृतमहोत्सव' निमित्ताने रहिमतपूर येथील आदर्श विद्यालयात वनक्षेत्रपाल आर. ए. काळे यांनी विद्यार्थ्यांना जलसंवर्धन, वन व वन्यजीव संवर्धन, वनीकरण याबाबतचे महत्व सविस्तरपणे विशद केले. त्याचबरोबर विविध प्रकारच्या वृक्षाची लागवड व जोपासना करणे ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट केले. यानिमित्ताने विद्यार्थ्यांना हरित शपथ देण्याबरोबर वनसंवर्धना संदर्भात निबंध व चित्रकला स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते.
त्याचबरोबर विद्यालयाच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते ७५ वृक्षांची लागवडही करण्यात आली. कार्यक्रमास आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल बोधे, वन कर्मचारी बी.वाय.जाधव, एस.बी.सागर, श्रीमती पी.एन.माने उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमासाठी विभागीय वनअधिकारी हरिश्चंद्र वाघमोडे, सहाय्यक वनसंरक्षक पी. एल. लंगडे यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |