09:41pm | Apr 14, 2021 |
सातारा : येथील मंगळवार पेठ बोगद्यातील सराईत गुंडास सातारा जिल्ह्यातून एक वर्षाकरिता तडीपार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
शाहुपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंगळवार पेठ, बोगदा येथील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार विजय ऊर्फ पिल्या राजु नलवडे (वय ३०, रा. ४३९, मंगळवार पेठ, सातारा) हा वारंवार गुन्हे करण्यात सरसावलेला असल्याने त्यास सातारा जिल्ह्यातून तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव शाहुपुरी पोलीस ठाण्याकडून पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांच्यामार्फत उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आला होता. या प्रस्तावाची सुनावणी पुर्ण होऊन उपविभागीय दंडाधिकारी यांनी विजय ऊर्फ पिल्या राजु नलवडे यास सातारा जिल्ह्यातून एका वर्षाकरीता तडीपार करण्याचे आदेश निर्गमीत केले आहेत.
रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार विजय ऊर्फ पिल्या राजु नलवडे याच्याविरुद्ध सातारा शहर, शाहपुरी पोलीस ठाणे येथे दरोडा, जबरी चोरी करणे, खंडणी, हत्यारानिशी अनाधिकाराने घरात प्रवेश करुन दुखापत पोहचविणे, गंभीर दुखापत पोहचविणे, गर्दी मारामारी करणे, शासकिय कामात अडथळा निर्माण करणे, शिवीगाळ दमदाटी करणे, जमाव बंदी व शस्त्र बंदी आदेशाचा भंग करणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यास पोलीसांनी वारंवार सुधारण्याची संधी देवुनही त्याच्या वर्तनात कोणताही बदल न होता तो वारंवार अधिक गुन्हे करत होता. त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीवरुन तो समाजास घातक होवुन त्याच्या वर्तनामुळे सामाजिक शांततेस बाधा निर्माण झाली होती. त्यामुळे शाहुपुरी पोलीस ठाणेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी त्याच्याविरुद्ध तडीपारीचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रकरणाची सुनावणी दरम्यान पोलीस निरीक्षक संजय पतंगे, तत्कालीन सपोनि विशाल वायकर व गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अंमलदारांनी या प्रकरणाचा वेळोवेळी पाठपुरावा करुन विजय ऊर्फ पिल्या राजु नलवडे यास तडीपार करण्यात यश प्राप्त केले आहे. या गुंडाची सातारा शहर, राजवाडा, बोगदा, मंगळवारपेठ भागात मोठी दहशत होती.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |