12:36pm | Sep 22, 2020 |
बुध: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात टाळेबंदी जाहीर करण्यात आली होती. टाळेबंदीमुळे बहुतांशी लोकांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. टाळेबंदी टप्प्याटप्याने हटविण्यात येत असली तरी सध्या महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे बुध, पुसेगाव परिसरातील नागरिकांना खंडित विजपुरवठ्याचा त्रास सहन करावा लागत असल्याने या परिसरात सध्या संतापाची लाट पहायला मिळत आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून बुध, पुसेगाव परिसरात सातत्याने वीज पुरवठा खंडीत करण्यात येत असून पुसेगाव ग्रामस्थांना त्यामुळे अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गेले पंधरा दिवस वीज वितरणद्वारे दोन दोन मिनीटाला वेळीअवेळी वीज पुरवठा खंडीत करण्यात येत असल्याने पुसेगाव ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.
सर्वसाधारणपणे मंगळवारी दुरुस्तीच्या नावाखाली दिवसभर वीज पुरवठा खंडीत असतो. परंतु अजूनही दुरुस्तीची कामे पूर्ण झालेली नाहीत. सध्या बुध, पुसेगाव परिसरात दररोज मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाच्या कालावधीत बंद करण्यात आलेला वीज पुरवठा अनेकवेळा पाऊस थांबल्यानंतर रात्रभर सुरु करण्यात आला नाही. त्यामुळे लोकांना अंधाराशी सामना करावा लागला. कोरोनामुळे सध्या अनेकदा बाजारपेठ बंद असते. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सध्या पुसेगाव येथे शासकीय विद्यानिकतेन जवळील यात्रास्थळावर भाजी मंडई भरविली जाते. त्यामुळे भाजीपाला खरेदीसाठी लोकांना एक दीड किलोमीटरची पायपीट करावी लागते. दुरवर जाऊन भाजीपाला खेरदी करावा लागत असल्याने लोक भाजीपाला फ्रीजमध्ये आणून ठेवतात.
सध्या अतिपावसामुळे शेतातील पीक वाया गेल्यामुळे भाजीपाल्यांचे दर गगनाला भिडले आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गेल्या आठवड्यात सात दिवसांचा जनता कर्फ्यु जाहीर करण्यात आला. त्यावेळीही लोकांनी ऐनवेळी भाजीपाल्याची उणीव भासू नये यासाठी भाजीपाला फ्रीजमध्ये ठेवला होता. परंतु त्याही काळात वीजेच्या सततच्या शिवणापाणीमुळे फ्रीज बंद राहिल्याने मोठ्याप्रमाणात भाजीपाल्याची व दुधदुभत्याती नासाडी झाली. कोरोनाच्या काळत आजही अनेक लोक घरातून ऑनलाईन कामे करत आहेत. अनेक विद्यार्थी घरातून ऑनलाईन शिक्षण घेत आहेत.
परंतु ऐन कामाच्यावेळीच वीज गायब असते. दररोज अनेकदा मिनीटामिनीटाला वीज येजा करत असल्याने बुध, पुसेगाव येथे ऑनलाईन कामाचा पुरता फज्जा उडाला आहे. वीजच्या या खेळखंडोब्यामुळे मुलांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. पुसेगाव येथे कोविड केअर सेंटर आहे. तेथे विविध गावातील लोकांवर उपचार सुरू आहेत. परंतु वारंवारच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे या केंद्रातही लोकांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. लॉकडाऊनच्या धक्क्यातून सावरलेले अनेक दुकानदार व्यवसायात स्थिरावत असतानाच त्यांनाही वारंवारच्या खंडीत वीज पुरवठ्यामुळे आर्थिक नुकसानीला जामोरे जावे लागत आहे. सध्या वीज वितरणच्या मनमानी कारभारावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. एकंदरीत येथील वीजपुरवठा केव्हा सुरळीत होणार अशी विचारणा येथील ग्रामस्थ करत आहेत.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |