02:23pm | Nov 08, 2022 |
नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि मोरबी पूल दुर्घटनेवरुन भाजपावर जोरदार टीका केली. मोरबी पूल दुर्घटनेत आतापर्यंत भाजपाकडून ना कुणी माफी मागितली ना कुणी राजीनामा दिला. या दुर्घटनेत १३५ लोकांचा मृत्यू झाला होता. गुजरातमध्ये प्रसाराचासाठी आलेल्या पी. चिदंबरम यांनी गुजरात सरकार दिल्लीहून चालवलं जात असल्याचा आरोप केला.
गुजरातमध्ये एक आणि पाच डिसेंबर रोजी दोन टप्प्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर मतमोजणी ८ डिसेंबर रोजी होणार आहे. मोरबीत ब्रिटीश कालीन केबल पूल ३० ऑक्टोबर रोजी कोसळला होता. यात १३५ जणांचा मृत्यू झाला. एका खासगी कंपनीकडून या पुलाच्या दुरूस्तीचं काम केलं गेलं होतं आणि चारच दिवसांनी ही दुर्घटना घडली होती.
"मोरबी दुर्घटनेबाबत जितकं मला माहित आहे त्यानुसार आतापर्यंत या घटनेसाठी सरकारकडून ना कुणी माफी मागितली आणि ना कुणी राजीनामा दिला आहे. हिच घटना जर परदेशात घडली असती तर तातडीनं राजीनामे घेण्यात आले असते. आगामी निवडणूक सहजपणे जिंकू असं भाजपाला वाटत आहे. त्यामुळेच त्यांनी या घटनेसाठी जनतेला उत्तर देणं त्यांना महत्वाचं वाटत नाही. गुजरातचं सरकार मुख्यमंत्री नव्हे, तर दिल्लीतून चालवलं जात आहे", असं पी. चिदंबरम म्हणाले.
काँग्रेसला संधी देण्याचं केलं आवाहन
"ज्या राज्यांमध्ये लोक सरकारला पराभूत करतात, त्यांना जबाबदारीची जाणीव असते वाटते. मी गुजरातच्या जनतेला आवाहन करतो की हे सरकार बदला आणि काँग्रेसला संधी द्या. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (सीबीआय) आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) या केंद्रीय तपास यंत्रणा भाजपाच्या नोकर असल्याचसारख्या वागत आहेत. या संस्थांनी अटक केलेल्यांपैकी ९५ टक्के विरोधी पक्षांचे राजकारणी आहेत", असंही पी. चिदंबरम म्हणाले.
छत्रपती शिवाजी कॉलेजची एन सी सी कॅडेट गार्गी थल सैनिक कँपसाठी दिल्लीला रवाना |
भा ज पा सातारा जिल्हा कोअर कमिटी आणि महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न |
साताऱ्यासह पश्चिम भागात पाऊस |
आरक्षण मिळेल, पण अगोदर नोकर्या वाचवा! |
कोंडवे येथील एका शाळकरी मुलाची आत्महत्या |
जनता सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदीच्या निवडी बिनविरोध |
जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत शानभाग विद्यालयाचे यश |
जिहे विकास सेवा सोसायटीचे कार्य उल्लेखनीय |
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
टेरेसवरून पडून महिलेचा मृत्यू |
बेदरकारपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
सोनगावातून सुमारे तीन लाखांच्या ट्रान्सफॉर्मर ची चोरी |
जबरी चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
दोन घटनांमध्ये दोन महिला बेपत्ता |
जनता सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदीच्या निवडी बिनविरोध |
जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत शानभाग विद्यालयाचे यश |
जिहे विकास सेवा सोसायटीचे कार्य उल्लेखनीय |
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
टेरेसवरून पडून महिलेचा मृत्यू |
बेदरकारपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
सोनगावातून सुमारे तीन लाखांच्या ट्रान्सफॉर्मर ची चोरी |
जबरी चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
दोन घटनांमध्ये दोन महिला बेपत्ता |
एमडीआरटी सल्लागारांच्या क्रमवारीत टाटा एआयए जगात पाचव्या तर भारतात पहिल्या स्थानी |
महालक्ष्मीच्या आरतीसाठी सोळा दिवे आणि 56 भोग |
बेडग ते मंत्रालय लॉंग मार्च आंदोलकांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी साताऱ्यात मान्यवरांची भेट |
व्यवहारातील संवेदना समजावणारे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळायला हवे |
बेडग येथील कमान प्रकरणाचा रिपाईद्वारे साखळी मोर्चा काढून निषेध |