01:06pm | Jun 04, 2020 |
नवी दिल्ली : कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी लॉकडाऊनचा पर्याय महत्वाचा होता. परंतु दीर्घकालीन कठोर लॉकडाउनने अर्थव्यवस्थेला प्रचंड फटका बसला आहे. अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी सरकारला बरच काही करता आले असते मात्र ते जमले नाही, अशी टीका बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी आज केली. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज बजाज यांच्याशी करोना संकटावर ऑनलाइन चर्चा केली. त्यावेळी बजाज यांनी आपली मते मांडली.
उद्योगांना सावरण्यासाठी बँकांच्या माध्यमातून मदत देण्यापेक्षा थेट मदत देणे आवश्यक होते, असे मत त्यांनी व्यक्त केले. एकीकडे बेरोजगारीचे आव्हान उभे ठाकले असताना उद्योगांना आता या संकटातून पूर्वपदावर येण्याचा आशावाद वाटत आहे. मात्र मागणी आणि वस्तूंचा खप वाढणे आवश्यक आहे. आतापर्यंत केवळ पत पुरवठ्यातूनच उद्योगांना दिलासा मिळाला आहे, असे बजाज यांनी सांगितले.
देशात लागू केलेला लॉकडाउन हा कठोरातील कठोर लॉकडाउन म्हटलं पाहिजे. अशा प्रकराची दीर्घकालीन टाळेबंदी मी अद्याप कुठल्या देशात पहिली नाही, असे बजाज यांनी गांधी यांना सांगितले. मात्र सामाजिक आणि भावनिकतेचा विचार करता टाळेबंदी इतर देशांच्या तुलनेत ठीक होती, असे त्यांनी सांगितले.
करोनाच्या संकटात सरकारने कसा सामना करावा, अर्थव्यवस्थेसमोर कोण कोणती आव्हाने आहेत याबाबत राहुल गांधी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांशी ऑनलाइन संवाद साधत आहेत. आतापर्यंत चारवेळा हा संवाद झाला आहे. बजाज यांच्या आधी राहुल गांधी यांनी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन, नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ प्राध्यापक अभिजित बॅनर्जी आणि सार्वजनिक आरोग्य सेवेतील तज्ज्ञ आशिष झा आणि जोहान गिसेक यांच्याशी संवाद साधला होता.
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |