सातारा : सातारा-लोणंद रस्त्यावर पाटखळ गावाच्या हद्दीत माऊली लॉज समोर देशी बनावटीचे 15 हजार रुपये किमतीचे पिस्टल बाळगणाऱ्या सुयोग दिलीप कदम राहणार मालगाव, तालुका सातारा याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याच्याकडील पिस्टल जप्त करण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या इसमांची माहिती प्राप्त करून कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा सक्रिय झाली आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना गोपनीय बातमीदाराकडून मालगाव येथील रेकॉर्डवरचा कदम नावाचा गुन्हेगार देशी पिस्टलसह फिरत असल्याची माहिती मिळाली होती. देवकर यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे आणि त्यांच्या पथकाने तत्काळ पाटखळ गावच्या हद्दीत सापळा रचून सुयोग कदम याला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीमध्ये 15 हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्टल आढळून आले. त्याच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
या कारवाईमध्ये उत्तम दबडे, आतिश घाडगे, विजय कांबळे, संजय शिर्के, शरद बेबले, संतोष सपकाळ, लक्ष्मण जगधने, प्रवीण फडतरे, मुनीर मुल्ला, अमित सपकाळ, निलेश काटकर, विक्रम पिसाळ, मोहन पवार, प्रवीण पवार, वैभव सावंत, विशाल पवार, केतन शिंदे, रोहित निकम, सचिन ससाणे, पृथ्वीराज जाधव यांनी सहभाग घेतला होता. पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी या कारवाईबद्दल स्थानिक गुन्हे शाखेचे अभिनंदन केले आहे.
युवकाचे अपहरण करून त्याचा खून केलेले संशयित 36 तासात रत्नागिरी येथून जेरबंद |
गर तू मेरा नही हो सका, तो किसी और का होने नहीं दूंगी... |
वाढे फाटा येथील मारेकरी ताब्यात; सूत्रधार कोण? |
दोन लाखांचे दागिने घेऊन कारागीर पळाला |
एकाची 35 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
टेस्टिंग सर्टिफिकेटच्या आमिषाने सुमारे 97 हजारांना गंडा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
बैलगाडीतून पडून महिलेचा मृत्यू |
दहावीतील मुलांनी धाक दाखवण्यासाठी चक्क क्लासमध्ये नेला कोयता |
राज्यात आदर्शवत ठरतील असे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आदर्श शाळा तयार करा : पालकमंत्री शंभूराज देसाई |
हॉटेलमध्ये विसरलेले १४ तोळे दागिने मिळाले परत |
रेशनिंग दुकानदार केरोसिन परवानाधारक संघटनेचे जिल्हा प्रशासनाला निवेदन |
कराडचा उड्डाणपूल पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून हिरवा कंदील... |

खानापूरच्या युवकाचा परखंदीत निर्घृण खून; वाई तालुक्यात खळबळ |
तांब्याच्या तारेची चोरी |
नोकरीच्या आमिषाने तब्बल चार लाख 99 हजाराची फसवणूक |
युवतीच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा दाखल |
मध्यमवर्गीय, शेतकरी, गोरगरीबांना न्याय देणारा अर्थसंकल्प |