10:47pm | Oct 16, 2020 |
सातारा : सातारच्या कला, साहित्य क्षेत्रातल्या कोणत्याही कामाला कसल्याही प्रकारचा अडथळा येणार नाही. जिल्ह्यात कोठेही सांस्कृतिक कार्यक्रम, चित्रीकरण करायचे असेल तर त्यासाठी लागणाऱ्या परवानग्या मी स्वतः जातीने लक्ष घालून मिळवून देईन. कोणत्याही मदतीसाठी तुम्ही मला केव्हाही हाक मारा मी नक्की येणार, अशी ग्वाही आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली.
राष्ट्रवादी भवन येथे सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चित्रपट ,साहित्य कला व सांस्कृतिक विभागाची जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना आमदार शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष सुनील माने, सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. याप्रसंगी आमदार शिंदे बोलत होते.
यावेळी बोलताना अभिनेते बाळकृष्ण शिंदे म्हणाले, आम्ही राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, अजितदादा पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्या विचारांना आदर्श मानून काम करू. साताऱ्यातील कला आणि साहित्य क्षेत्रातील लोकांना सुयोग्य वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करू. कलाकारांच्या छोटे मोठे प्रश्न योग्य त्या प्रयत्नांनी सोडविण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी कायम प्रयत्नशील राहू.
जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी प्रास्ताविक केले. तेजस शिंदे यांनी आभार मानले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्षपदी अविनाश सावंत (माण -खटाव), संजय पाटील (पाटण), मंदार शेंडे (वाई), सुहास चव्हाण (कराड) यांची तर जिल्हा सरचिटणीसपदी प्रेम भोसले (कोरेगाव), जिल्हा सहसचीव नितेश गायकवाड (सातारा/कोरेगाव), सातारा जिल्हा समन्वयक आरती गौड, सातारा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जमीर आतार, सातारा जिल्हा संघटक अक्षय साळुंखे यांच्या निवडी झाल्या.
सातारा तालुकाध्यक्षपदी डॉ. अजय वाडते, कराड दक्षिण तालुकाध्यक्ष संतोष मोहिते, कराड उत्तर तालुकाध्यक्ष अभिषेक सातपुते, पाटण तालुकाध्यक्ष अनिता वरेकर, वाई तालुकाध्यक्ष सचिन अनपट, फलटण तालुकाध्यक्ष अमोल देशमुख, खंडाळा तालुकाध्यक्ष सुधाकर गाढवे, महाबळेश्वर तालुकाध्यक्षपदी सोनाली घाडगे, खटाव तालुकाध्यक्ष योगेश देशमुख, कोरेगाव तालुकाध्यक्ष प्रणौती थिटे, जावली तालुकाध्यक्ष धोंडीबा सुतार यांची निवड करण्यात आली.
यावेळी शहराध्यक्षपदी रश्मी साळवी, वाई शहराध्यक्ष हेमंत झोरे, फलटण शहराध्यक्ष पृथ्वीराज बर्गे, कराड शहराध्यक्ष आनंद चव्हाण, पाटण शहराध्यक्ष संजय डुबल यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |