12:27pm | Apr 23, 2021 |
पुसेगाव: कोरेगाव तालुक्यातील एकंबे, बिचुकले आणि नलवडेवाडी (बिचुकले) या गावांची वाटचाल कोरोना हॉटस्पॉटकडे होती. मात्र आमदार शशिकांत शिंदे यांनी या गावातील कोरोनाबाधित रुग्णांसाठी संपूर्ण औषधोपचाराची कीट, ऑक्सिजन सिलेंडर आणि ऑक्सिजन मशीन व्यवस्था उपलब्ध करुन देत चांगला निर्णय घेतला आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी केले.
आमदार शशिकांत शिंदे यांनी स्वनिधीतून एकंबे येथे 500, बिचुकले येथे शंभर आणि नलवडेवाडी (बिचुकले) येथील 50 कोरोनाबाधित रुग्णांसाठी संपूर्ण औषधोपचाराची कीट, ऑक्सिजन सिलेंडर आणि ऑक्सिजन मशीन व्यवस्था केली असून, या साहित्याचे वितरण गुरुवारी दुपारी पंचायत समितीमध्ये ना. पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. आमदार शशिकांत शिंदे, सातारा जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष तेजस शिंदे, सभापती राजाभाऊ जगदाळे, माजी सभापती संजय झंवर, रमेश उबाळे, डॉ. गणेश होळ, डॉ.नितीन सावंत आदींची प्रमुख उपस्थिती होती.
ना.पाटील पुढे म्हणाले की, राज्य शासनाने कोरोना रोखण्यासाठी कडक निर्बंध घातले असून, सर्वसामान्य जनता त्याचे पालन करत नाही, हे दुर्देवी आहे. ग्रामीण भागात नियमांचे पालन होत नसल्याने एकंबे, बिचुकले आणि नलवडेवाडी (बिचुकले) येथे कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी आ. शशिकांत शिंदे यांनी घेतलेला निर्णय अत्यंत योग्य आहे.
आ. शशिकांत शिंदे म्हणाले की, एकंबे गावाने कोरोना हॉटस्पॉटकडे वाटचाल सुरु केल्यानंतर तातडीने जिल्हा प्रशासनाशी चर्चा करुन अधिकाधिक तपासणी करण्याबाबत सूचना केल्या. स्वत: गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली आणि शासनाचे नियम पाळण्याच्या सूचना दिल्या. आरोग्य उपकेंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतरीत केले असून, तेथे चार बेड्सची व्यवस्था केली आहे. ज्या रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे, त्यांच्यावर प्राथमिक उपचार तेथेच होतील अशी व्यवस्था केली आहे. भविष्यकाळात आणखी गरज लागल्यास औषधोपचार कीट उपलब्ध करुन दिले जाणार आहेत.
कार्यक्रमास राष्ट्रवादी युवक काँग्रेचे शहराध्यक्ष सनी शिर्के, अजित बर्गे, बिचुकलेचे सरपंच प्रशांत पवार, एकंबे येथील माजी सरपंच हणमंत मदने, बाळासाहेब कदम, केतन चव्हाण, अतुल चव्हाण, विकास शिंदे उपस्थित होते.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |