08:44pm | May 13, 2022 |
चिपळूण : तालुक्यातील वेहेळे भोजनेवाडी येथील राधाकृष्ण मंदिराच्या भव्य महोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. मॅटवरील कबड्डी स्पर्धेचा प्रथम क्रमांक क्रमांकांचा कालभैरव कोयनानगर मानकरी ठरला आहे. तर या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सातारा नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी आमदार शेखर निकम यांचा कंदी पेढ्यांचा हार घालून भव्यदिव्य सत्कार केला. या सत्काराने आ. निकम भारावून गेले. या कार्यक्रमाचा भाविक व क्रीडा रसिकांनी पुरेपूर आनंद लुटला.
वेहेळे भोजनेवाडी येथे राधाकृष्ण मंदिराच्या रौप्य महोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता. यावेळी कीर्तन, हरिजागर असे कार्यक्रम उत्साहीपूर्ण वातावरणात पार पडले. याचबरोबर मॅटवरील कबड्डी स्पर्धा खेळवण्यात आली. या स्पर्धेत कालभैरव कोयनानगर हा संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. द्वितीय महाकाली कुंभार्ली संघ, तृतीय सिद्धिविनायक कळकवणे तर चतुर्थ क्रमांक सिद्धार्थ धामणे संघाने मिळवला या यशस्वी संघांना आमदार शेखर निकम व सातारा नगरपरिषदेचे सुहास राजेशिर्के यांच्यासह वेहेळे भोजनेवाडी येथील ग्रामस्थांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
राधाकृष्ण मंडळाचे कार्य कौतुकास्पद : आमदार शेखर निकम
यावेळी आमदार शेखर निकम आपल्या मनोगतात म्हणाले की, सलग गेली २५ वर्षे राधाकृष्ण मंडाणे राबवलेले उपक्रम कौतुकास्पद आहे. विशेष म्हणजे प्रिय महोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व कबड्डी स्पर्धेचे नियोजन करून येथील क्रीडा रसिकांना आपला खेळ दाखवण्याची संधी उपलब्ध करून दिली. खेळाडूने जिंकण्यासाठी खेळायचे असते. मॅच संपल्यानंतर सर्व विसरून जायचं आहे. खेळ असो अथवा कोणतेही क्षेत्र असो. त्या त्या चुका करायच्या नाहीत. चुका सुधारता आल्या पाहिजेत. खेळाबरोबर फिटनेस देखील महत्त्वाचे आहे असे सांगताना सातारचे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी कोरोना काळात आपल्या जन्मभूमीत केलेले काम कौतुकास्पद आहे, अशा शब्दात श्री. राजेशिर्के यांचे कौतुक केले.
जीवनात जिद्द महत्वाची : सुहास राजेशिर्के
सातारचे माजी उपनगराध्यक्ष सुहासस राजेशिर्के यांनी आपल्या मनोगतात राधा-कृष्ण युवक मंडळाची तळमळ धडपड पाहून भारावून गेलो आहे. कबड्डी खेळाचा यानिमित्ताने आनंद लुटता आला. आपण खेळात जसे समरस होतो तसे प्रत्येक क्षेत्रात समरस झाले पाहिजे. जिद्दीच्या जोरावर आपण इथपर्यंत पोहोचलो असल्याचे सांगत प्रत्येकाने जिद्द कायम ठेवा राजकारणात सातारा येथे नाव कमावले नंतर जन्मभूमी कडे आलो आहे. राजकारण वाईट नाही. माईंड गेम आहे. राजकारणात अचूकपणा, वेळेचे भान व सर्वांना सोबत घेऊन जातो. तू राजकारणात यशस्वी होतो, अशा शब्दात राजकारण वाईट नाही याचा न अक्षर करताना सर्वांनी जिद्द ठेवा, असे आवाहन यावेळी केले.
यावेळी माजी उपसभापती सुर्यकांत खेतले, माजी पंचायत समिती सदस्य नितीन ठसाळे, खेर्डीचे माजी सरपंच दशरथ दाभोळकर, वेहेळे ग्रामपंचायत माजी उपसरपंच प्रकाश भोजने, सदस्य दिलीप भोजने, माजी सरपंच दिलीप राजेशिर्के, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष उदय भोजने, गोविंद मिरगल, महेश वाजे, राम राजेशिर्के, बंड्या राजेशिर्के तसेच राधाकृष्ण युवक मंडळातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. येथील अखंड हरिनाम सप्ताह सोहळा व मॅटवरील कबड्डी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
शिवथरला नऊ महिन्याचे अर्भक मृतावस्थेत आढळल्याने खळबळ |
आता शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी होणार |
साताऱ्यात पोलिसांवरच आंदोलन करण्याची वेळ |
अविनाश भोसलेंना अटक झाली; जिल्ह्यातील हस्तक अधिकार्यांना कधी? |
पुणे-महाबळेश्वर बसमध्ये सापडली बंदुकीची गोळी |
शाहूनगर येथे लोकवर्गणीतून बसवले जाणार सीसीटीव्ही कॅमेरे |
गोडोली जकात नाका परिसरातील हातगाडे पालिकेने केले जप्त |
रणसिंगवाडी सोसायटीच्या चेअरमनपदी लक्ष्मण जाधव, व्हाईस चेअरमनपदी सुभद्रा पोतेकर बिनविरोध |
राजापूर सोसायटीच्या चेअरमनपदी जयवंतराव डंगारे, व्हाईस चेअरमनपदी दादा लवंगारे बिनविरोध |
गोळीबाराने हादरली अमेरिका ! |
सांगवी येथे जुगार अड्ड्यावर छापा : एकावर गुन्हा |
भाजपने तिसरी जागा लढवली तरी फरक पडत नाही, विजय आमचाच होणार |
छत्रपतींचा सन्मान नव्हे, स्वपक्षाचा संकुचित विचार केला |
जिल्हा प्रशासनाच्यावतीने ‘दामिनी’ ॲप वापरण्याचे आवाहन |
पालखी मार्गावर १० जूनपर्यंत कामे पूर्ण करा |
शाहूनगर येथे लोकवर्गणीतून बसवले जाणार सीसीटीव्ही कॅमेरे |
गोडोली जकात नाका परिसरातील हातगाडे पालिकेने केले जप्त |
रणसिंगवाडी सोसायटीच्या चेअरमनपदी लक्ष्मण जाधव, व्हाईस चेअरमनपदी सुभद्रा पोतेकर बिनविरोध |
राजापूर सोसायटीच्या चेअरमनपदी जयवंतराव डंगारे, व्हाईस चेअरमनपदी दादा लवंगारे बिनविरोध |
गोळीबाराने हादरली अमेरिका ! |
सांगवी येथे जुगार अड्ड्यावर छापा : एकावर गुन्हा |
भाजपने तिसरी जागा लढवली तरी फरक पडत नाही, विजय आमचाच होणार |
छत्रपतींचा सन्मान नव्हे, स्वपक्षाचा संकुचित विचार केला |
जिल्हा प्रशासनाच्यावतीने ‘दामिनी’ ॲप वापरण्याचे आवाहन |
पालखी मार्गावर १० जूनपर्यंत कामे पूर्ण करा |
केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईत हस्तक्षेप होता कामा नये |
राज्यसभा निवडणुक : संभाजीराजे छत्रपती अर्जही भरणार नाहीत ? |
परबांसोबत शिवसेनेचे यशवंत जाधव अडचणीत |
गुणवंत विद्यार्थ्यांनी गौरीशंकरची शैक्षणिक प्रतिमा उंचविली : श्रीरंग काटेकर |
महाराष्ट्रात सरकारी कर्मचाऱ्यांची तब्बल २.४४ लाख पदे रिक्त |