सातारा : सातारा शहर पोलिस ठाण्यात कर्तव्य बजावणारे सपोनि धोंडिराम शिवाजी वाळवेकर (वय 37, सध्या रा.तामजाईनगर, सातारा मूळ रा.बाजार भोगाव ता.पन्हाळा, कोल्हापूर) यांना 25 लाखाची लाच मागणी केल्याप्रकरणी अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. लाच मागणी रक्कम मोठी असल्याने त्यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा तपास सातारा एसीबी करणार आहे. दरम्यान, एसीबीने रात्री उशीरा सपोनि यांच्या दोन्ही घरावर छापे टाकले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, या प्रकरणातील तक्रारदार हे शासकीय कर्मचारी आहे. या तक्रारदाराविरुध्द पाणी वाटपाबाबत लाखो रुपये घेवून ती रक्कम शासनाकडे जमा न करता परस्पर लाटल्याप्रकरणी त्यांच्याविरुध्द फेब्रुवारी 2020 रोजी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. फसवणूकीबाबत चार महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल झाल्यानंतर माहुली चौकीचे कारभारी असल्याच्या कारणाने त्याचा तपास सपोनि धोंडिराम वाळवेकर यांच्याकडे आला.
सपोनि वाळवेकर तपास करत असताना त्यांनी या गुन्ह्यात मदत करण्यासाठी संशयिताकडे 25 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. यामुळे संबंधिताने सातारा एसीबीत तक्रार दिली. एसीबीच्या पडताळणीमध्ये 25 लाखाच्या रकमेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यावरुन सोमवारी एसीबी विभागाने त्यांना अटक केली. पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि अविनाश जगताप यांनी मंगळवारी दुपारी सपोनि यांना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायाधिशांनी सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली. लाचेच्या मागणी रकमेचा आकडा 25 लाख रुपये असल्याने त्यामध्ये आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे का? याचा तपास करायचा असल्याचे एसीबीने न्यायालयात सांगितले.
दरम्यान, सोमवारी रात्री सपोनि वाळवेकर यांना अटक केल्यानंतर त्यांच्या तामजाईनगर येथील भाड्याच्या घरी व मूळ गावी एसीबी पोलिसांनी छापे टाकले आहेत. त्याबाबत माहिती घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. यामुळे समोर आलेल्या संपत्तीची माहिती मिळू शकली नाही. सपोनि वाळवेकर यांच्यावरील कारवाईने शहर पोलिस ठाण्यात दुसर्या दिवशी त्याबाबत चर्चा सुरु होती. सोमवारी रात्री सपोनि वाळवेकर खाकी वर्दीत होते. ते बाहेर जेलसमोर असताना एसीबी विभागाने अचानक त्यांना पकडले. खाकीतील पोलिसाला पकडल्यानंतर त्याठिकाणी गोंधळ उडाला. काही जणांना ती पोलिसांची चेष्टा चालवल्याची वाटली.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |