सातारा : सातारा जिल्ह्यात एकीकडे कोरोनाचे रूग्ण वाढत असताना कोरोनामुक्तीचा सिलसिला सुरूच आहे. काल रात्री उशीरा 7 व आज सायंकाळी 1 असे सातारा जिल्ह्यातील 8 जणांचे रिपोर्ट कोरोनाबाधित आले आहेत. त्याचवेळी जिल्हा रूग्णालयात हडपसर (पुणे) येथून आलेल्या 27 वर्षीय पुरुषाचा मृत्युनंतर घेण्यात आलेला नमुना निगेटिव्ह आला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील 19 नागरिक आज कोरोनातून पूर्णपणे बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले.
जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असला तरी कोरोनावर मात करणार्या रूग्णांचे प्रमाणही चांगले असल्याने लोकांच्या हृदयावरील भार हलका झाला आहे. काल रात्री रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये कराड तालुक्यातील खराडे येथील 15 वर्षीय युवक, शिंदेवाडी (विंग) येथील 15 वर्षीय युवक, शेणोली स्टेशन येथील 14 वर्षीय युवती, वाई तालुक्यातील डुईचीवाडी येथील 15 वर्षीय युवती, सातारा तालुक्यातील कुस बुद्रुक येथील 16 वर्षीय युवक, कारंडवाडी (देगाव रोड) येथील 65 वर्षीय महिला तसेच खटाव तालुक्यातील निढळ येथील 26 वर्षीय महिला यांचा समावेश आहे. आज सायंकाळी खटाव तालुक्यातील वडगाव येथील 75 वर्षीय पुरुषाचा अहवाल कोविडबाधित आला आहे. सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे हडपसर (पुणे) येथून आलेल्या 27 वर्षीय पुरुषाच्या मृत्युनंतर घेण्यात आलेला नमुना निगेटिव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
19 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज
कराड येथील कृष्णा मेडिकल कॉलेज येथे दाखल असणारे 5, पार्ले येथील कोरोना केअर सेंटर येथे दाखल असणारे 3, खावली येथील कोरोना केअर सेंटर येथे दाखल असणारे 5 आणि रायगाव येथील कोरोना केअर सेंटरमधील 6 असे एकूण 19 नागरिक आज कोरोनातून पूर्णपणे बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले. कृष्णा मेडिकल कॉलेज येथे दाखल असणारे वानरवाडी येथील 1 पुरुष व 1 महिला, उंब्रज येथील 1 महिला, पाटण तालुक्यातील सदुवरपेवाडी येथील 1 महिला, नवारस्ता येथील 1 मुलगी. पार्ले कोरोना केअर सेंटर, कराड येथील दाखल असणारे जावली तालुक्यातील सावरी येथील 2 महिला व 1 पुरुष. खावली कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल असणारे वाई तालुक्यातील आसरे येथील 1 महिला, कोरेगाव तालुक्यातील वेळू येथील 1 पुरुष, रायघर (ता. सातारा) येथील 1 महिला, शेळकेवाडी (ता. सातारा) येथील 1 पुरुष, सावरी (ता. जावली) येथील 1 महिला, रायगाव कोरोना केअर सेंटर येथे दाखल असणारे जावली तालुक्यातील सायगाव येथील 1 पुरुष, केळघर येथील 2 महिला व 2 पुरुष, मोरघर येथील 1 महिला यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
जिल्ह्यात आजअखेर 579 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी 254 रुग्ण बरे झाले आहेत. तर 301 रुग्णांवर उपचार सुरु असून 24 जणांचा मृत्यू झालेला आहे. दरम्यान, एनसीसीएस, पुणे यांच्याकडून 125, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड यांच्याकडून 13 जणांचे, क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे तपासणी करण्यात आलेल्या 23 जणांचे त्याचबरोबर खासगी प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आलेल्या 76 असे एकूण 237 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे डॉ. गडीकर यांनी सांगितले.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |