04:19pm | Aug 14, 2022 |
सातारा : फलटण-शिंगणापूर रस्त्यावर वडले गावच्या हद्दीमध्ये ट्रीपल सीट असलेल्या दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली असून या अपघातात तीनजण जागीच ठार व 3 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. आज रविवारी दि. 14 रोजी दुपारी ही दुर्देवी घटना घडली असून घटनास्थळी फलटण पोलिस दाखल झाले आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, फलटणवरुन शिंगणापूर दिशेने चाललेल्या बजाज कंपनीच्या पल्सर 220 दुचाकी क्र. (एम.एच- 11 सी. पी.- 0658) वरुन ऋषिकेश किशोर चिंचकर, श्रेयश गोविंद कदम, यशराज सतिश सुळ हे तिघे निघाले होते. यावेळी समोरून जावलीच्या दिशेने होंडा शाईन दुचाकी क्रमांक (एम. एच.- 11 बी. एफ- 8490) या दुचाकी वरुन महेश शिवाजी गोफणे, पद्मसिंह विश्वास गोफणे, धनंजय भगवान गोफणे हे तिघे जात होते. वडले येथे समोरासमोर दोन्ही दुचाकीत अपघात होऊन तीन जण जागीच ठार झाले आहेत.
या अपघातात ऋषिकेश किशोर चिंचकर (वय- 18, रा. मलठण, ता. फलटण, जि. सातारा), श्रेयश गोविंद कदम (वय- 21, रा. कापशी, ता. फलटण, जि. सातारा), महेश शिवाजी गोफणे (वय- 33, रा. जावली, ता. फलटण) हे तिघे ठार झाले. तर यशराज सतीश सुळ (वय- 18, रा. पणदरे, ता. बारामती, जि. पुणे), पद्मसिंह विश्वास गोफणे (रा. जावली, ता. फलटण), धनंजय भगवान गोफणे (रा. जावली, ता. फलटण) हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर फलटण शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या तिघांचीही परिस्थिती गंभीर स्वरूपाची असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे.
या अपघाताची माहिती समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अरगडे, धोंगडे, पोलीस नाईक देशमुख, कॉन्स्टेबल शेख, गायकवाड, खरात यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होवून पुढील कार्यवाही सुरू केली.
छत्रपती शिवाजी कॉलेजची एन सी सी कॅडेट गार्गी थल सैनिक कँपसाठी दिल्लीला रवाना |
भा ज पा सातारा जिल्हा कोअर कमिटी आणि महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न |
साताऱ्यासह पश्चिम भागात पाऊस |
आरक्षण मिळेल, पण अगोदर नोकर्या वाचवा! |
कोंडवे येथील एका शाळकरी मुलाची आत्महत्या |
जनता सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदीच्या निवडी बिनविरोध |
जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत शानभाग विद्यालयाचे यश |
जिहे विकास सेवा सोसायटीचे कार्य उल्लेखनीय |
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
टेरेसवरून पडून महिलेचा मृत्यू |
बेदरकारपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
सोनगावातून सुमारे तीन लाखांच्या ट्रान्सफॉर्मर ची चोरी |
जबरी चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
दोन घटनांमध्ये दोन महिला बेपत्ता |
जनता सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदीच्या निवडी बिनविरोध |
जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत शानभाग विद्यालयाचे यश |
जिहे विकास सेवा सोसायटीचे कार्य उल्लेखनीय |
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
टेरेसवरून पडून महिलेचा मृत्यू |
बेदरकारपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
सोनगावातून सुमारे तीन लाखांच्या ट्रान्सफॉर्मर ची चोरी |
जबरी चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
दोन घटनांमध्ये दोन महिला बेपत्ता |
एमडीआरटी सल्लागारांच्या क्रमवारीत टाटा एआयए जगात पाचव्या तर भारतात पहिल्या स्थानी |
महालक्ष्मीच्या आरतीसाठी सोळा दिवे आणि 56 भोग |
बेडग ते मंत्रालय लॉंग मार्च आंदोलकांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी साताऱ्यात मान्यवरांची भेट |
व्यवहारातील संवेदना समजावणारे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळायला हवे |
बेडग येथील कमान प्रकरणाचा रिपाईद्वारे साखळी मोर्चा काढून निषेध |