05:24pm | May 16, 2020 |
फलटण : संपूर्ण देशात आणि सातारा जिल्ह्यात हाहाकार माजविणार्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भाडळी बु॥ येथील पोलीस पाटलाने पैसे घेवून परजिल्ह्यातील नागरिकांना गावामध्ये लपवून ठेवले असून त्यामुळे संपूर्ण गावालाच कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पोलीस पाटलासह संबंधित नागरिकांवरही जिल्हा प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशा आशयाचे निवेदन विशाल डांगे यांनी फलटण उपविभागीय अधिकारी यांना दिले आहे.
याबाबत विशाल बबनराव डांगे रा. भाडळी बु॥ ता. फलटण यांनी फलटण उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, भाडळी बु॥ या गावामध्ये सुमारे पाच ते सहा दिवसांपूर्वी नवी मुंबई येथून या गावच्या माहेरवाशीन असलेल्या दोन महिला त्यांच्या मुलाबाळांसमवेत वास्तव्यास आल्या आहेत. नियमानुसार परगावावरुन आलेल्या व्यक्तीची माहिती प्रांत अधिकारी कार्यालय तसेच स्थानिक पोलीस ठाण्यात देणे आवश्यक असतानाही भाडळी बु॥ गावचे पोलीस पाटील हनुमंत दत्तात्रय सोनवलकर यांनी संबंधितांबरोबर आर्थिक तडजोड करुन त्या महिलांबाबतची माहिती प्रशासनाला दिली नाही त्यामुळे संबंधित पोलीस पाटलाने जिल्हाधिकार्यांच्या आदेशाची पायमल्ली केलेली आहे. संबंधित पोलीस पाटील हा तालुक्यातील एका सक्रिय राजकीय गटाचा पूर्णवेळ कार्यकर्ता आहे. त्यामुळे कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने मुंबई-पुणे तसेच इतरत्र कामानिमित्त विस्थापित झालेल्या भाडळी बु॥ येथील लोकांना गावात आल्यानंतर त्यांच्याशी आर्थिक तडजोड करुन त्यांची माहिती प्रशासनाला देत नाही. संबंधित महिला या सुरज व आकाश डांगे यांच्या भगिनी असून हे दोघेही गावातील राजकीय पुढारी आहेत. त्यामुळेच गावचे पोलीस पाटील सोनवलकर यांनी याबाबतची माहिती प्रशासनाला दिली नसल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. असे असताना संबंधित महिला व त्यांची मुले राजरोसपणे गावात फिरतात त्यामुळे गावातील नागरिकांना कोरोना प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याबाबत लक्ष घालून संबंधित महिला व त्यांच्या मुलांची तत्काळ वैद्यकीय तपासणी करावी. तसेच पैसे घेवून जिल्ह्याबाहेरील लोकांना गावात अभय देणार्या पोलीस पाटील सोनवलकर यास तत्काळ निलंबित करुन त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन विशाल डांगे यांनी फलटण उपविभागीय अधिकारी तथा प्रांतांना दिले आहे.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |