02:27pm | Apr 15, 2021 |
नवी दिल्ली: संपूर्ण देशात कोरोनाने पुन्हा एकदा हाहाकार माजवला आहे. दिल्लीतही वाढती कोरोनाबाधित रूग्णसंख्या पाहता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी वीकेण्ड कर्फ्यूची घोषणा केली आहे. अरविंद केजरीवाल यांनी राज्यातील जतनेशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी ही घोषणा केली. कर्फ्यूमध्ये अत्यावश्यक गोष्टींना परवानगी असणार आहे.
चित्रपटगृहांना 30 टक्के प्रेक्षक क्षमतेसह सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली असली तरी सभागृह, मॉल, जीम आणि स्पा बंद असणार आहेत. बाहेर जेवण्याला बंदी असून होम डिलिव्हरीची परवानगी आहे. आठवडी बाजारांना परवानगी आहे, मात्र त्यांना निर्बंधाचं पालन करावं लागेल. कर्फ्यूमध्ये लग्नासाठी जाणार्यांना ई-पास दिला जाईल अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.
हे सर्व निर्बंध तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या भल्यासाठी आहेत. यामुळे थोडी अडचण होईल पण करोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी हे निर्बंध गरजेचे आहेत, असं अरविंद केजरीवाल यांनी यावेळी सांगितलं. अरविंद केजरीवाल यांनी यावेळी लोकांना न घाबरण्याचं आवाहन करताना वीकेण्डला अत्यावश्यक सर्व सेवा सुरु राहतील असं सांगितलं आहे.
नायब राज्यपालांसोबत झालेल्या बैठकीनंतर अरविंद केजरीवाल यांनी वीकेण्ड कर्फ्यूची घोषणा केली. दिल्लीमध्ये करोना रुग्णांसाठी बेडची कमतरता नसल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. तसंच सार्वजनिक ठिकाणी निर्बंधांची कडक अमलबजावणी करणार असल्याचं ते म्हणाले आहेत.
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |

भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप वचनबद्ध |
जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त |
दिव्यांग व्यक्तिंसाठी मतदान केद्रांवर आवश्यक सोयी : याशनी नागराजन |