कराड : कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षेविषयी जागरुकता निर्माण करणे आणि देशातील दुर्घटना थांबवणे, दुर्घटनेमुळे होणारी प्राणहानी वाचविणे या उद्देशाने काम करीत असल्याचे प्रतिपादन पॉवर ग्रिड कार्पोरेशन कार्यकारी संचालक आर. आर. यादव यांनी केले.
औद्योगिक, आरोग्य, रस्ते आणि पर्यावरण चळवळीसह लोकांना सुरक्षिततेबद्दल जागरूक करण्याच्या उद्देशाने 51 वा राष्ट्रीय सुरक्षा दिवसाचे कराड येथे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय सुरक्षा दिवसाचे औचित्य साधून रस्ते अपघात व सुरक्षा संबंधाने कल्पतरू ग्रुप ऑफ पॉवर ट्रांसमिशन कंपनीने जनजागृतीपर प्रबोधन कार्यक्रम कराडमध्ये कर्मचाऱ्यांसाठी आयोजित केला होता.
यावेळी पॉवर ग्रिड कारपोरेशनचे कार्यकारी संचालक आर. आर. यादव, कल्पतरू पावर ट्रांसमिशन कंपनीचे जनरल मॅनेजर पी.के. झा, कल्पतरू पॉवर ट्रांसमिशन कंपनीचे मॅनेजर राजेंद्र चव्हाण, बी.पी. पांडे, वरिष्ठ सुरक्षा अधिकारी नितेश जनबंधू, सुरक्षा अधिकारी चंद्रभान पटेल, शितल ठिगळे उपस्थित होते.
राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा करावा, यासाठी नेशनल सेफ्टी काउंसिलने पुढाकार घेतला. नेशनल सेफ्टी काउंसिल एक स्वायत्त संस्था आहे. जी सार्वजनिक सेवेसाठी काम करीत आहे. आम्ही कल्पतरू पॉवर ट्रांसमिशन कंपनीद्वारे आमच्याकडे असणाऱ्या सेवकांमध्ये सातत्याने प्रबोधन करुण सुरक्षेबाबत जागृती करीत असल्याची माहिती कल्पतरू पॉवर ट्रांसमिशन कंपनीचे जनरल मॅनेजर पी.के. झा यांनी दिली.
राष्ट्रीय सुरक्षा दिवसाचे औचित्य साधून जनजागृती करताना कर्मचारी यांना केवळ सुरक्षेबाबतच जागरूक केले जात नाही. तर औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षितता, महिला सुरक्षा, रस्ता सुरक्षा याबाबतही जागरूक केले जाते. भेसळयुक्त अन्नपदार्थांमुळे होणार्या आजारांपासून संरक्षण, याबाबतही जनजागृती केली जाते, असे कल्पतरू पावर ट्रांसमिशन कंपनीचे मॅनेजर राजेंद्र चव्हाण व बी.पी. पांडे यांनी सांगितले.
कर्मचारी वर्गाला सुरक्षिततेच्या अनेक पद्धतींबद्दल जागरूक केले जाते, जेणेकरुन ती वेळ आल्यावर स्वतःचे संरक्षण करू शकतील. त्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा दिवसाचे महत्त्व ओळखून विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये जनजागृती केले जाते, असे नितेश जनबंधू यांनी प्रास्ताविक करताना सांगितले. सुरक्षा अधिकारी शितल ठिगळे यांनी आभार मानले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |