08:41pm | Nov 19, 2020 |
कोरेगाव : कोरेगाव तालुक्यात गेल्या आठवड्यात गांजा तस्करीचे रॅकेट आयपीएस रितू खोखर यांनी उध्दवस्त केल्यानंतर आता रॅकेटच्या मुख्य सुत्रधारापर्यंत पोहोचण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. खटाव आणि माण तालुक्यातील प्रत्येकी दोघांना अटक केल्यानंतर आता गांजा जेथून सप्लाय केला जातो, त्या ठिकाणी म्हणजेच काळमळ (पिलीव), ता. माळशिरस येथे बुधवारी रात्री धडक कारवाई करत मुख्य सुत्रधाराला ताब्यात घेतले.
त्याच्याकडून २ लाख ९५ हजार ४१० रुपये किंमतीचा ४९ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी माळशिरस पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सुत्रधाराला मात्र कोरेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शुक्रवार दि. १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास सातारा-लातूर महामार्गावर चिमणगाव गोठ्यानजिक होंडा ऍक्टिव्हा स्कुटरवरुन गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती रितू खोखर यांना खबर्यामार्फत मिळाली होती. त्यांनी विशेष पथक तयार करुन होंडा ऍक्टिव्हा स्कुटर क्र. एम. एच. ११-बी. वाय.-३०९१ वरुन चाललेल्या हसिम नजीर झारी व सचिन तुकाराम मदने, दोघे रा. पुसेगाव यांना ताब्यात घेतले होते. त्यांच्या कबज्यातून ४ किलो १८५ ग्रॅम वजन असलेला गांजा जप्त केला. त्यांच्याकडील मोबाईल हँडसेटसह एकूण ७७ हजार ८३० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला होता.
त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्यांनी दहिवडीतील बाजार पटांगणाजवळ राहत असलेल्या सुनील किसन जाधव व प्रकाश अशोक जाधव यांच्याकडून गांजा खरेदी करत असल्याची कबुली दिली होती. रितू खोखर यांच्या पथकाने त्याच रात्री दहिवडीत धडक कारवाई करत दोघांना अटक केली. त्यांच्या घर झडतीमध्ये ६३ हजार ५७० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. त्यांच्या विरुध्द कोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली होती.
तपासादरम्यान दहिवडीतील दोघांनी काळमळ (पिलीव), ता. माळशिरस येथील लक्ष्मण रामू जाधव याच्याकडून गांजा खरेदी करत असल्याची कबुली दिली होती. त्यानंतर बुधवारी रात्री रितू खोखर यांच्या पथकाने काळमळ (पिलीव) येथे छापा टाकून जाधव याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २ लाख ९५ हजार ४१० रुपये किंमतीचा ४९ किलो गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी माळशिरस पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपअधीक्षक गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आयपीएस अधिकारी रितू खोखर, उपनिरीक्षक विशाल कदम, सहाय्यक उपनिरीक्षक प्रल्हाद पाटोळे, हवालदार विजय जाधव, पोलीस नाईक धनंजय दळवी, अमोल सपकाळ, किशोर भोसले, कर्मचारी साहिल झारी, इंद्रजित भोसले, अजय गुरव, तुषार बाबर, निलेश जांभळे, शंकर पांचागणे यांच्यासह होमगार्ड्सच्या पथकाने ही कारवाई केली.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |