08:03pm | Feb 03, 2023 |
सातारा : सातारा जिल्ह्यातील रास्त भाव धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक संघटनेच्या वतीने दि 7 ते 9 फेब्रुवारी दरम्यान पॉज मशिन बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. ऑनलाईन सर्वर चा सततचा बिघाड ही मूळ तक्रार असल्याचे सांगत संघटना अध्यक्ष श्रीकांत शेटे यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना निवेदन सादर केले.
सातारा जिल्हा रास्तभाव धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक संघटना, सातारा यांच्या वतीने दुकानदारांना येणाऱ्या अडचणी व समस्यांबाबत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी अमर रसाळ, निवासी नायब तहसीलदार दयानंद कोळेकर यांना समक्ष भेटून निवेदन देण्यात आले.
हे निवेदन संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत शेटे यांचे नेतृत्वाखाली देण्यात आले. याप्रसंगी सातारा जिल्ह्यातील तालुक्यांचे तालुकाध्यक्ष उपस्थित होते. अजित कासुर्डे- महाबळेश्वर, राजेंद्र भिलारे- जावली, तुकाराम भादुले- खटाव, राजेंद्र भोईटे- कोरेगाव, मधुकर पवार- खंडाळा, आप्पासाहेब तोडकरी- खंडाळा, सातारा तालुका उपाध्यक्ष- बबनराव देवरे, उपाध्यक्ष- संजय रजपूत, सातारा तालुक्यातील बबलू साळुंखे, इतर पदाधिकारी, रेशन दुकानदार बंधु-भगिनी उपस्थित होते.
ऑनलाईन सर्वरमध्ये बिघाड, दुकानदारांच्या तक्रारीची एनआयसीने न घेतलेली दखल, त्यामुळे दुकानदार व खातेदार यांच्यात होणारे वादाचे प्रसंग, अन्न सुरक्षा योजनेचे एक वर्षाचे प्रलंबित कमिशन, दुकानदारांच्या दैनंदिन खर्चाची अडचण इं तक्रारींकडे श्रीकांत शेटे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. या मागण्यांचा गांभीर्याने विचार न झाल्यास ७ ते ९ फेब्रुवारी पॉझ मशिन बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
सातारा पोलिसांनी केली जिल्ह्यातील मोटार सायकल चोरी करणारी टोळी तडीपार |
गुढीपाडवा मोठ्या उत्साहात सातारा जिल्ह्यात साजरा |
मोदी सरकारच्या निषेधार्थ साताऱ्यात काँग्रेसची निदर्शने |
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ जागतिक दर्जाचे विद्यापीठ करण्याचे आव्हान पेलूयात |
अनैतिक संबंधांच्या कारणावरून फलटणमध्ये महिलेचा खून |
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून फलटण व माढा मतदार संघात ४ कोटींचा भरीव निधी |
सातारा शहरातून दुचाकीची चोरी |
विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवकाची गळफास घेऊन आत्महत्या |
दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
जाशी येथे खोऱ्याच्या दांड्याने महिलेला मारहाण |
स्विफ्ट आणि मालवाहतूक टेम्पोच्या धडकेमध्ये महिला जखमी |
ट्रॅक्टर अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
महिलेच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर गुन्हा |
दुचाकीची चोरी |
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून फलटण व माढा मतदार संघात ४ कोटींचा भरीव निधी |
सातारा शहरातून दुचाकीची चोरी |
विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवकाची गळफास घेऊन आत्महत्या |
दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
जाशी येथे खोऱ्याच्या दांड्याने महिलेला मारहाण |
स्विफ्ट आणि मालवाहतूक टेम्पोच्या धडकेमध्ये महिला जखमी |
ट्रॅक्टर अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
महिलेच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर गुन्हा |
दुचाकीची चोरी |
अपघातात नुकसान केल्याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
शेंद्रे येथे अनावधानाने गोळी सुटून कामगार जखमी |
शिवसेना जिल्हाप्रमुखांनी घेतली बँक व्यवस्थापकाची झाडाझडती |
जावली तालुक्यातील आडवी बाटली उभी करणार्यांविरोधात सायरन आंदोलन |
मारहाण प्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल |