02:04pm | Sep 02, 2022 |
इंदूर : मध्य प्रदेशच्या इंदूरमधील एका खासगी कंपनीच्या सात कर्मचारी कंपनीबाहेर एकाचवेळी विष प्यायले. त्यांना सहकाऱ्यांनी रुग्णालयात दाखल केलं. विष प्यायलेल्या सातही कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या जीवाला सध्या कोणताही धोका नाही. सात कर्मचाऱ्यांना मालकानं अचानक कंपनीतून बाहेर काढलं. त्यामुळे तणावाखाली आलेल्या कर्मचाऱ्यांनी टोकाचं पाऊल उचललं. परदेशीपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अजमेरा वायर कंपनीत हा प्रकार घडला. ही कंपनी मॉड्युवर किचन तयार करण्याचं काम करते. इथे १५ ते २० कर्मचारी काम करतात. कंपनीचे मालक रवी बाफना आणि पुनीत अजमेरा यांनी दोन दिवसांपूर्वी सात कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं. त्यामुळे ते तणावाखाली होते, अशी माहिती कंपनीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यानं दिली.
जमनाधार विश्वकर्मा, दीपक सिंह, राजेश मेमियोरिया, देवीलाल करेडिया, रवी करेडिया, जितेंद्र धमनिया आणि शेखर वर्मा अशी विष प्राशन केलेल्या कर्मचाऱ्यांची नावं आहेत. कंपनीत आता तुमच्यासाठी कोणतंही काम नाही, असं सांगून ७ कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. हे सातही कर्मचारी गेल्या २० वर्षांपासून कंपनीत काम करत होते.
कंपनीतून अचानक काढण्यात आल्यानं कामगार तणावाखाली होते. काल सकाळी सातही कर्मचारी कंपनीच्या गेटजवळ पोहोचले. तिथे त्यांनी विष प्राशन केलं. कंपनीतील त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना एम. वाय. रुग्णालयात दाखल केलं. सगळ्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या जीवाला कोणताही धोका नाही. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले.
कंपनीत २० कर्मचारी काम करतात. गेल्या ७ महिन्यांपासून कंपनीचं काम बंद आहे. मालकानं कर्मचाऱ्यांना ७ महिन्यांचा पगारदेखील दिलेला नाही, अशी माहिती तपास अधिकारी अजय सिंह कुशवाह यांनी दिली. सात कर्मचाऱ्यांना बाणगंगा येथील दुसऱ्या कारखान्यात शिफ्ट करण्यात आलं. त्यामुळे त्यांनी विष प्राशन केलं. सगळ्या कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे त्यांचा जबाब नोंदवता आलेला नाही. त्यांचा जबाब नोंदवल्यावर पुढील कारवाई करण्यात येईल, असं कुशवाह यांनी सांगितलं.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |