04:42pm | Oct 24, 2020 |
सातारा: सध्या जागतिक स्तरावर कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव गेल्या सहा-सात महिन्यापासून सुरु आहे. सातारा जिल्हयातही कोरोनाने थैमान घातले आहे. अद्यापपर्यंत कोणती लस किंवा प्रभावी गुणकारी औषध मिळालेले नाही, या पार्श्वभुमीवर प्रतिवर्षीप्रमाणे, रविवार दि.25 ऑक्टोबर 2020 रोजी राजघराण्याचा होणारा विजयादशमीचा शाही सिमोल्लंघन सोहळा योग्य ते सामजिक अंतर राखुन आयोजित करण्यामधील धोका लक्षात घेवून खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी अशी माहिती जलमंदिर पॅलेस, सातारा येथुन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जनसंपर्क कार्यालयातुन एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
शिवप्रभु छत्रपतींच्या राजगादीची विजयादशमीचे दिवशी सिमोल्लंघनाची पूर्वापार चालत आलेली परंपरा, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी तितक्याच तोलामोलाने पुढे चालु ठेवली आहे. हा शाही सिमोल्लंघन सोहळा सातारकर आणि सर्वसामान्य जनतेचा मोठा उत्सव ठरला आहे. यावेळी विधीवत श्री भवानी तलवारीचे पूजन जलमंदिर पॅलेस येथे झाल्यावर या ऐतिहासिक तलवारीची जलमंदिर ते पोवईनाका अशी पालखीतुन मिरवणुक काढण्यात येवून, पोवईनाका येथे सिमोल्लंघनाचे विधीवत पूजन करण्यात येते. पूजन झाल्यावर परत ही पालखी जलमंदिर पॅलेस येथे आल्यावर पूजा-अर्चा झाल्यावर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि राजघराण्यातील सर्व सन्माननीय सदस्य हे समस्त सातारकरांच्या आपटयाच्या पानांचा स्विकार करतात आणि त्यानंतर समस्त सातारकर नागरीक एकमेकांना सोने लुटतात अशी ऐतिहासिक परंपरा लाभलेला हा सोहळा मोठया उत्साहात आणि प्रथा-परंपरेप्रमाणे साजरा केला जात असतो. हा एक जनतेचा उत्सव असतो.
तथापि यंदाच्या कोरोनाच्या भीषण परिस्थित कोणताही धोका पत्करणे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना आवश्यक वाटत नसल्याने, यंदाचा रविवार दि.25/10/2020 रोजी होणारा विजयादशमी शाही सिमोल्लंघन सोहळा रदद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व संबधीतांसह खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर प्रेम, निष्ठा असणार्या हितचिंतक, कार्यकर्ते, नागरीक, जेष्ठ व्यक्ती आदी सर्वांनी नोंंद घेवून सहकार्य करावे असे विनंती आवाहन जलमंदिरपॅलेस येथ्ाुन देण्यात आलेल्या प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |